Virat Kohli's 100th T20I: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात आणखी एक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा विराट पहिला भारतीय ठरलाय आणि जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरलाय. दुबई आतंरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळताच विराटच्या नावावर खास विक्रमाची नोंद झालीय. विराटच्या आधी न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरनं तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळले होते. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचा हा 100 वा सामना आहे.


टी-20 क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारे खेळाडू
विराट कोहलीच्या अगोदर 13 क्रिकेटपटूंनी 100 किंवा त्यापेक्षा अधिक टी-20 सामने खेळले आहेत.  रोहित शर्मा (132), शोएब मलिक (124), मार्टिन गुप्टिल (121), महमदुल्लाह (119), मोहम्मद हाफीज (119), इयोन मॉर्गन (115), पॉल स्टर्लिंग (114), केव्हिन ओ ब्रायन (110), जॉर्ज डॉकरेल (105), डेविड मिलर (104), रॉस टेलर (102), कायरन पोलार्ड (101) आणि रमुश्फिकुर रहीम (100) यांनी 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या यादीत विराट कोहलीचाही समावेश झालाय. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार 74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


पाकिस्तानविरुद्ध विराटची आतापर्यंतची कामगिरी
विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी केलीय. पाकिस्तानविरुद्ध सात डावात त्यानं 77.75 च्या सरासरीनं 311 धावा केल्या आहेत. यावेळी विराट कोहलीनं तीन अर्धशतक झळकावली आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्रईक रेट 118.25 इतका होता. एवढंच नव्हे तर, पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं तीन वेळ सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. 


पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह. 
पाकिस्तान 


हे देखील वाचा-