Ind vs Pak, Asia Cup 2022: आशिया चषक-2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आपला पहिला सामना खेळत आहेत. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताचा रोहित शर्मानं सर्वांना चकीत करणारा निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात  युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला (Rishabh Pant) वगळून दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संघात संधी देण्यात आली. रोहित शर्माच्या या निर्णायावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. ऋषभ पंत गेल्या एक-दोन वर्षांपासून सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. मात्र, तरीही त्याला संघातून वगळण्यात आल्यानं चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही (Gautam Gambhir) याबाबत आपली प्रतिक्रिया दिलीय.


पाकिस्तानविरुद्ध सामन्यात ऋषभ पंतला वगळण्यात आल्यानं चाहते सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकासाठी कशी तयारी करत आहे? ऋषभ पंतला प्लेईंग इलेव्हन वगळण्याचा कोणाचा निर्णय होता? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. तर काही चाहत्यांनी ऋषभ हा भारतीय संघाचे भविष्य असताना दिनेश कार्तिकला जास्त प्राधान्य का दिले जात आहे? असाही प्रश्न काही चाहत्यांनी विचारलाय.


ट्वीट-


ट्वीट-


ट्वीट- 


गौतम गंभीर काय म्हणाला?
नाणेफेकीनंतर गंभीर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला की, "ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संघात स्थान देणं मला काही समजलं नाही. माझ्या मते रवींद्र जाडेजा ऐवजी दीपक हुडाला संघात स्थान दिलं जाऊ शकत होतं." 


संघ-


भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह. 
पाकिस्तान 


पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी. 


हे देखील वाचा-