Gautam Gambhir Waved Sri Lanka Flag : आशिया चषक 2022 च्या (Asia Cup 2022) अंतिम सामन्यात श्रीलंकेनं (Sri Lanka Team) पाकिस्तानला (PAK vs SL) 23 धावांनी मात देत ट्रॉफी जिंकली आहे. या विजयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी, उपस्थित चाहत्यांनी धिंगाणा केलाच पण त्याचवेळी माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर यानेही श्रीलंकेचा झेंडा फडकावला तसंच स्वत:च्या अधिकृत ट्वीटरवरुन संबधित व्हिडीओ पोस्ट देखील केला. ज्यानंतर या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. यावेळी काहीजण पाकिस्तान जिंकल्यानंतरही असंच केलं असतस का? असा सवालही गंभीरला विचारला. 


श्रीलंकेच्या विजयानंतर गंभीरने एक व्हिडिओ ट्वीट करत पोस्ट केला आहे. यामध्ये तो मैदानातच श्रीलंकेचा झेंडा घेऊन उभा राहिल्याचं दिसत आहे. यासोबतच गंभीरने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे की, “सुपरस्टार टीम... खरोखरच विजयाची पात्र आहे. अभिनंदन श्रीलंका.” गंभीरच्या या व्हिडिओला ट्वीटरवर हजारो जणांनी लाईक केले आहे. तर हजारोंनी यावर कमेंटही केली आहे. काही चाहते गंभीरच्या या व्हिडीओचं कौतुक करत आहेत. तर काहीजण सवाल उपस्थित करत आहेत.


गंभीरचा व्हिडीओ - 






व्हिडीओवर विविध चाहत्यांच्या विविध कमेंट्स






 






 







सामन्याचा लेखा-जोखा


आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं. सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आलं.  


त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील चौथ्या चषकात कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्यात रुपात संघाला दोन मोठे धक्के बसले.मात्र, त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पण इफ्तिखार 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. मोहम्मद नवाजही स्वस्तात माघारी परतला. पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात हसरंगानं तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. अखेर पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून प्रमोद मादुशाननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, वानिंदु हसरंगाला तीन विकेट्स मिळाल्या. याशिवाय,  चमिका करुणारत्नेनं दोन आणि महेश तीक्ष्णानं एक विकेट्स घेतली.  


हे देखील वाचा- 


T20 World Cup 2022 : भारतासाठी आनंदाची बातमी, बुमराह पुनरागमन करणार, लवकरच होणार वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा


Watch : 'मारो मुझे मारो' मीम व्हिडीओमधला साकिब पाकिस्तानच्या पराभवानंतर दु:खी, सलमानच्या गाण्यावर शेअर केला मजेशीर VIDEO