Asia Cup 2022 Final Sri Lanka Prize Money : श्रीलंका संघाने (Sri Lanka Team) आशिया कप 2022 च्या (Asia Cup 2022) अंतिम सामन्यात पाकिस्तानला (PAK vs SL) 23 धावांनी मात देत चषकावर नाव कोरलं आहे. या विजयानंतर श्रीलंका संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. यावेळी त्यांचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) याला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने 1.50 लाख डॉलर्सचा चेक दिला. तसंच सामनावीर आणि मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंनाही यावेळी मोठी रक्कम मिळाली. 


श्रीलंका संघाने अंतिम सामना जिंकत आशिया कप 2022 जिंकल्यानंतर त्यांना 1.50 डॉलर्स बक्षीस म्हणून मिळाले. दरम्यान दीड लाख डॉलर्स भारतीय रुपयांमध्ये विचार केल्यास 1.2 कोटी इतके आहेत. तर मालिकावीर वानिंदु हसरंगा याला 15 हजार डॉलर्सचा चेक मिळाला. भारतीय रुपयांनुसार ही किंमत 12 लाख रुपये इतकी आहे. तसंच फायनलमध्ये कमाल कामगिरी करणाऱ्या भानुका राजपक्षे  याला 5 हजार डॉलर्स तर बेस्ट कॅच ऑफ द मॅचसाठी 3 हजार डॉलर्सचा चेक मिळाला. दुसरीकडे पाकिस्तान संघाला उपविजेता म्हणून 75 हजार डॉलर्स (भारतीय रुपयांनुसार 60 लाख रुपये) देण्यात आले. 






पाकिस्तानला मात देत श्रीलंका विजयी


आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं. सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आलं.  


त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील चौथ्या चषकात कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्यात रुपात संघाला दोन मोठे धक्के बसले.मात्र, त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पण इफ्तिखार 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. मोहम्मद नवाजही स्वस्तात माघारी परतला. पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात हसरंगानं तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. अखेर पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून प्रमोद मादुशाननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, वानिंदु हसरंगाला तीन विकेट्स मिळाल्या. याशिवाय,  चमिका करुणारत्नेनं दोन आणि महेश तीक्ष्णानं एक विकेट्स घेतली.  


हे देखील वाचा-