नवी दिल्ली: देशभरात आयपीएल फायनलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरने इतिहास रचला आहे. दिपा करमाकरनं आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. दिपा करमाकरनं 2015 च्या अंतिम फेरीत कांस्य पदक जिकंल होतं. उझबेकिस्तानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ स्पर्धकांच्या यादीत दिपा करमाकनं सोनेरी कामगिरी करत पहिलं स्थान पटकावलं.
दिपा करमाकरनं अंतिम फेरीत 13.566 गुणांची कमाई केली. दिपानंतर उत्तर कोरियाची किम सोन ह्यांग ही 13.466 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. तिनं रौप्य पदक पटकावलं. तर, जो क्योंग ब्योल हिनं 12.966 गुणांसह कांस्य पदक पटकावलं.
दिपा करमाकरनं 2016 म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यावेळी ती चौथ्या स्थानी राहिली होती. तिचं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं होतं. ग्लासगो येथे 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिपा करमाकरनं कांस्य पदक जिंकलं होतं.
दिपा करमाकरनं 21 महिन्यांची बंदी देखील घालण्यात आली होती. त्यानंतर दिपा करमाकरनं कमबॅक करत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
दिपा करमाकरचं कमबॅक
दिपा करमाकरनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेलं सुवर्णपदक खास मानलं जातं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या करिअरच्या खडतर काळातून जात होती. दिपा करमाकरवर डोपिंग प्रकरणात 21 महिन्यांची बंदी घलण्यात आली होती. याशिवाय ती दुखापतींनी देखील ग्रस्त होती. गेल्यावर्षी जिमनॅस्टिकमध्ये दीपा करमाकरनं पुनरागमन केलं होतं. मात्र, ती चांगल्या फॉर्मसाठी संघर्ष करत होती. त्यामुळं तिला ऑलिम्पिक स्पर्धेला देखील मुकावं लागलं.
आशियाई चॅम्पियन शिपमध्ये पदक मिळवणारे भारतीय खेळाडू
आशिष कुमारनं 2006 मध्ये सुरतमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं होतं. हिरोशिमामध्ये 2015 मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत दिपा करमाकरनं कांस्य पदक जिंकलं होतं. 2019 आणि 2022 मध्ये प्रनाती नायकनं कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. आत 2024 च्या आशियाई चॅम्पियन शिप स्पर्धेत दिपा करमाकरनं सुवर्णपदाकवरं नाव कोरलं आहे.
संबंधित बातम्या :
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल