Asian Games 2023 : आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतीय संघासाठी रविवारचा दिवस चांगला होता. भारताला एकूण 5 पदके मिळाली आहेत. आशियाई खेळांमध्ये भारतातून एकूण 655 खेळाडू सहभागी झाले आहेत, जे आतापर्यंत देशातील सर्वात मोठे संघ आहे. एकूण 40 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आव्हान देतील. 


 


भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत


10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य
पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य
पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य
पुरुष कॉक्सड 8 संघ (रोइंग): रौप्य
महिला 10 मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य



भारतासाठी आजचा दिवस मोठा!
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळाले. मेहुली घोष, आशी चौक्सी आणि रमिता यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतासाठी हे पदक जिंकले. त्यानंतर रोइंगमध्येही भारताने रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. भारतीय महिला क्रिकेट संघानेही अंतिम फेरी गाठली. नंतर रमिताने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव करून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारताने 5 पदके जिंकली आहेत.


 


भारताला पहिल्यांदाच लाइट वेट दुहेरी रोईंगमध्ये पदक


भारताला पहिले पदक रोइंगमध्ये मिळाले, अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी लाइट वेट दुहेरीत रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत 6:28:18 गुणांसह भारतासाठी रौप्यपदक जिंकण्यात ते यशस्वी ठरले. याशिवाय 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताचे दुसरे पदक महिला संघाने पटकावले. मेघुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी भारतासाठी दिवसाचे दुसरे पदक जिंकले. भारताला पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत लाइट वेट दुहेरी रोईंगमध्ये पदक मिळाले आहे. याआधी या स्पर्धेत एकाही भारतीयाला पदक मिळाले नव्हते. मात्र, 2010 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगलाल ठक्करने सुवर्णपदक जिंकून चमत्कार केला होता. याशिवाय 2006 दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळाले होते. 2014 च्या आशियाई स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात स्वरण सिंग यशस्वी ठरला होता.


 










 



भारतीय महिलांची दमदार कामगिरी, पदक केले निश्चित
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली आहे. उपांत्य सामन्यात बांगलादेशचा पराभव करत भारताने पदक निश्चित केलेय. भारताच्या गोलंदाजंनी बांगलादेशला अवघ्या 51 धावांत रोखले. हे आव्हान भारताने आठ विकेट आणि 12 षटके राखून सहज पार केले. बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. कर्णधार स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी धावांचा गती वाढवली. पण संघाची धावसंख्या 19 झाल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार स्मृती मंधाना सात धावांवर बाद झाली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि जेमिमा यांनी भाराताचा डाव सावरला. दोघांनी भारताचा विजय दृष्टीक्षेपात आणला. पण त्याचवेळी शेफाली वर्मा 16 धावांवर तंबूत परतली. त्यानंतर जेमिमाने भारताला विजय मिळवून दिला. जेमिमान नाबाद 20 धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकारांचा समावेश आहे.


 


 


 






 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Asian Games 2023 : भारतीय महिलांची दमदार कामगिरी, पदक केले निश्चित, बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश