Asif Ali and Fareed Ahmad : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत 7 सप्टेंबर रोजी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pak vs Afg) सामन्यात पाकिस्तानने एक विकेटने विजय मिळवला. याच सामन्यात पाकिस्तानच्या असिफ अली आणि अफगाणिस्तानच्या फरीद अहमद यांच्यात चांगलाच वाद झाल्याचं दिसून आलं. आधी फरीदनं दमदार सेलिब्रेशन केलं असताना त्यानंतर असिफनं थेट बॅट उगारल्याचं दिसून आलं. या सर्वानंतर आता अफगाणिस्तानचा माजी कर्णधार गुलाबदीन नाईब (Gulbadin Naib) याने थेट असिफ अली याला बॅन करण्यात यावं अशी मागणी केली.
यावेळी असिफ याने ट्वीट करत बंदी घालण्याची मागणी केली आहे. ट्वीटमध्ये सामन्यातील एका फोटो पोस्ट करत गुलाबदीननं लिहिलं आहे की, ''असिफ अलीचं हे वागणं अगदी मूर्खपणाचं आहे आणि त्यामुळे उर्वरीत टूर्नामेंटमधून त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, कोणत्याही गोलंदाजाला आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे पण असिफ अलीचे वागणे अजिबात मान्य नाही.''
नेमकं काय घडलं?
अखेरच्या दोन षटकात सामना रोमांचक स्थितीत पोहचला होता. 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघाची फलंदाजी कोलमडली होती. अशातच 19 व्या षटकात फरीद अहमद (Fareed Ahmad) याने दोन विकेट घेत अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण नसीम शाहने अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार मारत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. याआधी 19 व्या षटकात फरीद अहमद (Fareed Ahmad) याने आसिफ अली (Asif Ali) याला बाद करत पाकिस्तानला नववा झटका दिला होता. या विकेटमुळे अफगाणिस्तानचा विजय निश्चित मानला जात होता. विकेट पडल्यानंतर फरीद अहमद (Fareed Ahmad) याने सेलिब्रेशन सुरु केले होते. यावेळी असिफ अलीला राग अनावर झाला. त्यानंतर तो बॅट घेऊन फरीदच्या अंगावर धावला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ -
फरीद अहमदने विकेट घेतल्यानंतर आपल्या अंदाजात सेलिब्रेशन केले. त्यानंतर आसिफ एकदम फरीदच्य जवळ पोहचला. त्यावेळी दोन्ही खेळाडूमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. त्याचवेळी आसिफ अलीने फरीदला बॅट उगारली. दोन्ही खेळाडूमध्ये गरमागरमीचं वातावरण पाहून अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत वाद सोडवला.
हे देखील वाचा-