IND vs AFG Match : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधील भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघानी आपआपला अखेरचा सामना गुरुवारी (8 सप्टेंबर) खेळला. रोमहर्षक सामन्यात भारताने अफगणिस्तानला 101 धावांनी मात दिली. यावेळी माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) पहिलं-वहिलं टी20 शतक ठोकत जवळपास 3 वर्षानंतर शतक ठोकलं. त्यामुळे सर्वत्र त्याच्या या शतकाची चर्चा आहे. अशावेळी सामन्यावेळचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खेळाडूंचा नसून स्टेडियममध्ये उपस्थित फॅन्सचा आहे. या व्हिडीओत भारत आणि अफगाणिस्तानचे फॅन्स अगदी मजा-मस्ती करत सामना एन्जॉय करत होते. दोन्ही देशांचे फॅन अगदी एकमेंकाना मिठी मारताना दिसून आले.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपलं असल्याने सामना केवळ औपचारीक होता. पण सामन्यात विराटनं शतक ठोकत सर्वांनाच सुखद धक्का दिला. त्यामुळे सामना अगदी अविस्मरणीय झाला. सामन्यावेळी अगदी खेळी-मेळीचं वातावरण दिसून येत होतं. याचदरम्यान दोन्ही देशांचे दोन कट्टर फॅन एकमेकांना मिठी मारत होते, तसंच दोन्ही देशांचे नारे देतानाही दिसून आले. 

पाहा VIDEO -

 

सामन्यांचं संपूर्ण स्कोरकार्ड -

अफगाणिस्तानची फलंदाजी -

हजरतुल्लाह जजई एलबीडब्ल्यू बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 4 0 0
रहमानुल्लाह गुरबाज बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 1 0 0
इब्राहिम जादरान नाबाद 64 59 4 2
करीम जनत कॉट विराट कोहली बोल्ड भुवनेश्वर कुमार 2 4 0 0
नजीबुल्लाह जादरान एलबीडब्ल्यू बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 2 0 0
मोहम्मद नबी एलबीडब्ल्यू बोल्ड अर्शदीप सिंह 7 7 1 0
अजमतुल्लाह ओमरज़ाई कॉट दिनेश कार्तिक बोल्ड भुवनेश्वर कुमार 1 6 0 0
राशिद खान कॉट अक्षर पटेल बोल्ड दीपक हूडा 15 19 2 0
मुजीब उर रहमान बोल्ड रविचंद्रन अश्विन 18 13 2 1
फरीद अहमद नाबाद 1 5 0 0
फज़ल हक    

भारताची गोलंदाजी 

BOWLING O M R W
भुवनेश्वर कुमार 4 1 4 5
दीपक चाहर 4 0 28 0
अर्शदीप सिंह 2 0 7 1
अक्षर पटेल 4 0 24 0
रविचंद्रन अश्विन 4 0 27 1
दीपक हूडा 1 0 3 1
दिनेश कार्तिक 1 0 18 0

भारताची फलंदाजी -

Batting R B 4s 6s
लोकेश राहुलझे नजीबुल्लाह जद्रान गो फरीद अहमद 62 41 6 2
विराट कोहलीनाबाद 122 61 12 6
सूर्यकुमार यादवत्रिफळाचीत फरीद अहमद 6 2 0 1
ॠषभ पंतनाबाद 20 16 3 0
दीपक हूडा        
दिनेश कार्तिक        
अक्षर पटेल        
रविचंद्रन अश्विन        
दीपक चाहर        
भुवनेश्वर कुमार        
अर्शदीप सिंह

अफगाणिस्तानची गोलंदाजी

BOWLING O M R W
फजल हक 4 0 51 0
मुजीब उर रहमान 4 0 29 0
फरीद अहमद 4 0 57 2
रशीद खान 4 0 33 0
मोहम्मद नबी 3 0 34 0
अझमतुल्ला ओमरझाई 1 0 8 0

हे देखील वाचा-