IND vs HK, Asia Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) तडाखेबाज खेळी आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकाच्या जोरावर भारतानं हाँगकाँग (India vs Hong Kong) समोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलंय. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या आशिया चषकातील चौथ्या सामन्यात हाँगकाँगनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून 192 धावांचा आकडा गाठला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं पॉवरप्लेमध्ये एक विकेट्स गमावून 44 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 13 चेंडूत 21 धावा करून झेलबाद झाला. केएल राहुलनंही (KL Rahul) अतिशय संथ खेळी केली. तो 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीनं भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवनं अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची दमदार खेळी केली. ज्यात सहा षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. दरम्यान, विराट कोहलीनंही अर्धशतक झळकावलं. त्यानं 44 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं तीन चौकार आणि एक षटकार लगावलाय. हाँगकाँगकडून मोहम्मद जहाफर आणि आयुष शुक्लाला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
हाँगकाँग प्लेइंग इलेव्हन:
निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅककेनी (विकेटकिपर), जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर
पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला होता. अफगाणिस्तान आधीच सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. तर, भारत हा एकमेव संघ आहे, ज्यानं एक सामना जिंकला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचं अजूनही विजयाचं खातं उघडलेलं नाही.
हे देखील वाचा-