IND vs HK Playing 11: भारत आणि हॉंगकाँग (India vs Hong Kong) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) आशिया चषकातील (Asia Cup 2022) चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हॉंगकाँगच्या संघानं प्रथम गोलंदाजी (Hong Kong opt to bowl) करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) या सामन्यात विश्रांती देण्यात आलीय. त्याच्याऐवजी भारताचा युवा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी देण्यात आलीय. पाकिस्तानविरुद्ध निराशाजनक कामगिरी करणारा भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आजच्या सामन्यात खेळणार आहे. 


भारत- हॉंगकाँग हेड टू हेड रेकार्ड
भारत आणि हॉंगकाँग यांच्यात आतापर्यंत दोन टी-20 सामने खेळले गेले. भारत आणि हाँगकाँगचा संघ पहिल्या 2008 च्या आशियाच्या चषकात आमने-सामने आले होते. त्यानंतर 2018 आशिया चषकात दोन्ही संघात सामना रंगला होता. या दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. 


भारत विरुद्ध हॉंगकाँग सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल?
भारत विरुद्ध हॉंगकाँग यांच्यातील सामना मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जातोय. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक झालंय. भारत विरुद्ध हॉंगकाँग यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.


संघ-


हाँगकाँग प्लेइंग इलेव्हन:
निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅककेनी (विकेटकिपर), जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर.


भारत प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.



हे देखील वाचा-