English Premier League: ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सीत दिसणार आहे. मँचेस्टर युनायटेडनं त्यांच्या निवेदनात याबाबत माहिती दिलीय. मँचेस्टर युनायटेडनं अँटोनीबाबत फुटबॉल क्लब अजाक्सशी (Ajax Football Club) करार केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड आणि अजाक्स यांच्यात 81.3 मिलियन पौंड म्हणजेच 750 कोटीचा करार झाल्याचं समजत आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या इतिहासातील हा चौथा सर्वात मोठा करार ठरलाय. 


अँटोनी हा 22 वर्षांचा आहे. 2020 पर्यंत त्यानं बाझीलच्या साओ पाउलो क्बलचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानंतर अजॅक्सनं त्याला आपल्या संघाचा सामील करून घेतलं. त्यानं गेल्या दोन वर्षांत अजॅक्सकडून 82 सामने खेळले. यादरम्यान त्यानं 24 गोल केले आहेत.


एरिक टेन हागचा निर्णय
मँचेस्टर युनायटेडचे ​​सध्याचे व्यवस्थापक एरिक टेन हाग हे अजॅक्सचे व्यवस्थापक होते, त्यावेळी त्यांनी अँटोनीला साओ पाउलोहून अजाक्समध्ये आणलं. त्याच्या प्रशिक्षणाखाली अँटोनीनं अजाक्समध्ये दोन वर्षे घालवली. एरिक टेन हाग आता मँचेस्टर युनायटेडमध्ये आल्यानंतर त्यानं अँटोनीलाही आपल्या संघात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.


अँटोनीची राष्ट्रीय संघासाठी कामगिरी
अँटोनीनं गेल्या वर्षीच ब्राझीलकडून पदार्पण केलं होतं. ऑक्टोबर 2021 मध्ये तो ब्राझीलकडून प्रथमच मैदानात उतरला. आतापर्यंत तो त्याच्या राष्ट्रीय संघासाठी 9 सामने खेळलाय. यामध्ये त्याच्या नावावर दोन गोलची नोंद आहे.


हे देखील वाचा-