India in Asia Cup 2022 : आशिया कप 2022 साठी (Asia Cup 2022) सर्व देशांचे अंतिम संघ जाहीर झाले आहेत. सर्व खेळाडूही युएईमध्ये पोहोचले असून कसून सराव करत आहेत. भारतीय संघ देखील आपल्या सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचे सर्व दिग्गज खेळाडू नेट्समध्ये दिवस-रात्र घाम गाळत आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) भारतीय खेळाडूंचे नेट्समधील सरावाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कर्णधार उपकर्णधार तसंच गोलंदाजांचाही समावेश आहे. विराटचा अगदी इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंत सर्वच खेळाडू किती जिद्दीने सराव करत आहे, हे दिसून येत आहे.
पाहा फोटो-
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्मा याच्याकडे देण्यात आलं आहे. तर उपकर्णधार म्हणून केएल राहुल जबाबदारी सांभाळेल. याशिवाय फलंदाजीची धुरा विराट, सूर्यकुमार यांच्याकडे असून मधल्या फळीत ऋषभ पंत, दीपक हुडा, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा हे असणार असून रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई या फिरकीपटूंसह भुवनेश्वर, अर्शदीप, आवेशवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.
आशिया कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
कसं आहे वेळापत्रक?
आशिया कप 2022 साठी भारत पाकिस्तान हे संघ एकाच गटात असून हाँगकाँग संघानेही यामध्ये पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटात अर्थात ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर नेमकी स्पर्धा कशी खेळवली जाईल पाहूया...
ग्रुप स्टेजचे सामने
27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
हे देखील वाचा-