Asia Cup 2022: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीच्या अतिशय खराब टप्प्यातून जात आहे. विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून एकही शतक झळकावता आलं नाही. तर, गेल्या सहा महिन्यापासून त्याला 50 धावांचा आकडाही ओलांडता आला नाही. तो मैदानात एक-एक धावेसाठी संघर्ष करताना दिसत आहे. विराटचं फॉर्ममध्ये परतणं, भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं आहे. ज्यामुळं विराटच्या फॉर्मसाठी त्याचे चाहते आणि  क्रिकेटप्रेमी प्रार्थना करतायेत. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीही (Shaheen Afridi) विराट कोहलीच्या फॉर्मसाठी प्रार्थना करतोय.


भारत- पाकिस्तान यांच्यात रविवारी रंगणार सामना
यूएईमध्ये उद्यापासून (27 ऑगस्ट) आशिया चषकाला सुरुवात होत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली. तेव्हा विराट कोहलीनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची भेट घेतली होती. ज्यानंतर सोशल मीडियावर या दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.


व्हिडिओ-



विराटच्या फॉर्मसाठी शाहीन आफ्रिदी करतोय प्रार्थना
विराट कोहलीनं गुरूवारी शाहीन आफ्रिदीची भेट घेतली. त्यावेळी विराट कोहलीनं त्याच्या दुखापतीबाबत विचारणा केली. त्यानंतर शाहीन आफ्रिदी म्हणाला की, "आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. लवकर तू फॉर्ममध्ये परतावा, अशी इच्छा आहे. मैदानावर चांगली कामगिरी करताना तुला बघायचं आहे", असं शाहीन आफ्रीदी म्हणाला.


विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. 


दुखापतीमुळं शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर
शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळं आशिया चषकातून बाहेर झालाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं याबाबत माहिती दिली. गुडघ्याच्या दुखापतीमुळं त्याला आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेला मुकावं लागलंय. यामुळं शाहीन आफ्रिदीच्या रुपात मोठा झटका बसलाय. 


हे देखील वाचा-