Asia Cup 2022, IND vs AFG: विराट कोहलीच्या वादळी शतकानंतर भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकाचा शेवट गोड केला आहे. आशिया चषकातील अखेरच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 212 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगणिस्थानचा संघ 111 धावांपर्यंत पोहचलाय. 

भारताने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. भुवनेश्वर कुमारच्या स्विंग गोलंदाजीसमोर अफगणिस्तानचे फलंदाजांनी नांग्या टाकल्या. भुवनेश्वर कुमारने चार षटकात चार धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानचा संघ कोलमडला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरान याने नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या.  

दरम्यान, विराट कोहलीनं तब्बल दोन वर्ष आणि 10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. त्यानं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं आहे. विराट कोहलीचं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधलं हे पहिलंच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 71वं शतक ठरलं. त्यानं 61 चेंडूंत 12 चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 122 धावांची खेळी उभारली. विराटच्या या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियानं सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तानला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियानं या सामन्यात वीस षटकांत दोन बाद 212 धावांची मजल मारली. लोकेश राहुल आणि विराट कोहलीनं 119 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा पाया रचला. त्यात राहुलचा वाटा 41 चेंडूंमधल्या 62 धावांचा होता. त्यानं ही खेळी सहा चौकार आणि दोन षटकारांनी सजवली. 

अफगाणिस्तानची फलंदाजी -

हजरतुल्लाह जजई एलबीडब्ल्यू बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 4 0 0
रहमानुल्लाह गुरबाज बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 1 0 0
इब्राहिम जादरान नाबाद 64 59 4 2
करीम जनत कॉट विराट कोहली बोल्ड भुवनेश्वर कुमार 2 4 0 0
नजीबुल्लाह जादरान एलबीडब्ल्यू बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 2 0 0
मोहम्मद नबी एलबीडब्ल्यू बोल्ड अर्शदीप सिंह 7 7 1 0
अजमतुल्लाह ओमरज़ाई कॉट दिनेश कार्तिक बोल्ड भुवनेश्वर कुमार 1 6 0 0
राशिद खान कॉट अक्षर पटेल बोल्ड दीपक हूडा 15 19 2 0
मुजीब उर रहमान बोल्ड रविचंद्रन अश्विन 18 13 2 1
फरीद अहमद नाबाद 1 5 0 0
फज़ल हक    

भारताची गोलंदाजी 

BOWLING O M R W
भुवनेश्वर कुमार 4 1 4 5
दीपक चाहर 4 0 28 0
अर्शदीप सिंह 2 0 7 1
अक्षर पटेल 4 0 24 0
रविचंद्रन अश्विन 4 0 27 1
दीपक हूडा 1 0 3 1
दिनेश कार्तिक 1 0 18 0

भारताची फलंदाजी -

Batting R B 4s 6s
लोकेश राहुलझे नजीबुल्लाह जद्रान गो फरीद अहमद 62 41 6 2
विराट कोहलीनाबाद 122 61 12 6
सूर्यकुमार यादवत्रिफळाचीत फरीद अहमद 6 2 0 1
ॠषभ पंतनाबाद 20 16 3 0
दीपक हूडा        
दिनेश कार्तिक        
अक्षर पटेल        
रविचंद्रन अश्विन        
दीपक चाहर        
भुवनेश्वर कुमार        
अर्शदीप सिंह

अफगाणिस्तानची गोलंदाजी

BOWLING O M R W
फजल हक 4 0 51 0
मुजीब उर रहमान 4 0 29 0
फरीद अहमद 4 0 57 2
रशीद खान 4 0 33 0
मोहम्मद नबी 3 0 34 0
अझमतुल्ला ओमरझाई 1 0 8 0