Asia Cup 2022 : अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश (AFG vs BAN) सामन्यात अफगाणिस्तानने बांग्लादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत ग्रुप स्टेजमधून पुढच्या फेरीत अर्थात सुपर 4 मध्ये पोहोचणारा अफगाणिस्तान पहिला संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने 127 धावा केल्या. ज्यानंतर केवळ तीन गडी गमावत अफगाणिस्तानने 18.3 षटकांत हे आव्हान पूर्ण करत विजय मिळवला.

 

सामन्यात नाणेफेक जिंकून बांग्लादेशने प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी बांग्लादेशच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. मोसद्दक होसेन याने केवळ 48 धावांची एकहाती झुंज दिली. ज्यामुळे अफगाणिस्तान किमान 127 धावांपर्यंत पोहोचला. अफगाणिस्तानकडून राशिद आणि मुजीब यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाचे सलामीवीर खास खेळी करु शकले नसले तरी इब्राहीम झद्रान आणि नजीबउल्लाह जद्रान यांनी अनुक्रमे नाबाद 42 आणि नाबाद 43 धावा करत संघाला 18.3 षटकांत विजय मिळवून दिला. 

अफगाणिस्तान सुपर 4 मध्ये

बांग्लादेशविरुद्धच्या या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवल्याने ग्रुप बी मध्ये ते आघाडीवर पोहोचले आहेत. सर्वात आधी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेला मात दिली होती. आता दोन विजय मिळवत अफगाणिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचत सुपर 4 मध्ये गेला आहे. आता बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना हा नॉकआऊट सामना होईल. दोघांच्यात जिंकणारा संघ सुपर 4 तर दुसरा संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे.

कसं आहे उर्वरीत ग्रुप स्टेजच्या सामन्यांचं वेळापत्रक?

31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश

ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.

सुपर 4 सामन्यांचे वेळापत्रक-

दिनांक संघ ग्रुप  ठिकाण   
शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-