Virat Kohli in Gym : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आशिया कप 2022 स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघात परतला आहे. भारताने रविवारी पाकिस्तानला 5 विकेट्सने मात दिली. यावेळी विराटने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आता हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट जीममध्ये कसून व्यायाम करत आहे. विराटने जीममधील फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.


विराट ब्लॅक रंगाच्या जीम आऊटफिटमध्ये व्यायाम करत आहे. यामध्ये तो डम्बेल्स उचलताना दिसत आहे. तसच या फोटोंना त्याने व्यायाम म्हणजे प्रेम असं दाखवणारे इमोजी कॅप्शन म्हणून दिले आहेत. दरम्यान विराट आपल्या फिटनेसबाबत कायमच जागृक असतो. त्यामुळे संघातीलच नाही तर क्रिकेट जगतातील एक फिट क्रिकेटर म्हणून तो प्रसिद्ध आहे. 


पाहा फोटो- 






हाँगकाँगच्या कर्णधारालाही वाटतं विराट फॉर्ममध्ये यावा


हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने विराट कोहलीच्या फॉर्मवर वक्तव्य करताना सांगितले की, ''मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. पाकिस्तानविरुद्ध विराटची महत्त्वपूर्ण खेळी होती. विराट कोहलीने पुन्हा एकदा भरपूर धावा कराव्यात अशी माझी इच्छा आहे. त्याने फॉर्ममध्ये परत यावे आणि भरपूर धावा कराव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे, असंही तो म्हणाला.


विराटनं रौफला भेट दिली जर्सी


दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर विराटने पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफशी संवाद साधला आणि सोबतच त्याला स्वत:ची सही असणारी जर्सीही भेट दिली. दरम्यान दोघांच्या या भेटीयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीसीसीआयने या दोघांच्या भेटीचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये कोहली आणि रौफ एकमेंकाशी संवाद साधताना दिसत आहेत. संभाषणानंतर कोहलीने रौफला त्याच्या जर्सीवर ऑटोग्राफ देऊन भेट दिली. कोहलीच्या या कृतीने दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. बीसीसीआयच्या या व्हिडिओला ट्वीटरवर काही वेळातच अनेकांनी लाईक केलं असून विविध कमेंट्सही केल्या आहेत. 


हे देखील वाचा-