एक्स्प्लोर

#AsiaCup2018 : अफगाणिस्तानचं भारताला 253 धावांचं आव्हान

सलामीवीर मोहम्मद शहजादने केलेल्या 124 धावांच्या जबरदस्त खेळीमुळे अफगाणिस्तानच्या डावाला आकार आला.

दुबई : आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानने भारताला 253 धावांचं आव्हान दिलं आहे. 50 षटकांत अफगाणिस्तानने आठ बाद 252 धावांची मजल मारली. सलामीवीर मोहम्मद शहजादने केलेल्या 124 धावांच्या जबरदस्त खेळीमुळे अफगाणिस्तानच्या डावाला आकार आला. शहजादने 11 चौकार आणि सात षटकार लगावत 116 चेंडूंमध्ये 124 धावा ठोकल्या. शहजादचं हे पाचवं वनडे शतक ठरलं. शहजादला समोरच्या एंडने मोहम्मद नबीने दमदार साथ दिली. त्याने 56 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांसह 64 धावांची खेळी केली. भारताकडून रवींद्र जाडेजाने तीन आणि कुलदीप यादवने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. खलील अहमद, दीपक चहार आणि केदार जाधवने प्रत्येकी एक विकेट काढली. आशिया चषकाच्या सुपर फोर साखळीत भारत आणि अफगाणिस्तान संघांमधल्या सुपर फोर सामना दुबईत सुरु आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाणने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यातून विश्रांती घेतली असून, त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. धोनीचा कर्णधार या नात्याने हा दोनशेवा वन डे आंतरराष्ट्रीय सामना आहे. शिखर धवन, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहल या प्रमुख शिलेदारांनाही या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी लोकेश राहुल, मनीष पांडे, खलील अहमद, सिद्धार्थ कौल आणि दीपक चहार यांना खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
IND vs WI 5th T20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
IND vs WI 5th T20 : शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका
शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
Embed widget