एक्स्प्लोर

अफगाणिस्तानविरुद्ध मधली फळी निरखून पाहण्याची संधी

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात आपली मधली फळी निरखून पाहण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

दुबई:  रोहित शर्माच्या टीम इंडियानं पाकिस्तानचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. या फायनलमध्ये खेळण्याआधी भारतीय संघाला आज सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तानशी दोन हात करण्याची संधी मिळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात आपली मधली फळी निरखून पाहण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. आशिया चषकात भारतानं सलग चार सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला. या चारही सामन्यांमध्ये भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळं मधल्या फळीच्या फलंदाजांवर फारसा ताण आलेला नाही. त्यामुळंच अफगाणिस्तानविरुद्धचा सामना म्हणजे फायनलच्या दृष्टीनं मधल्या फळीतल्या फलंदाजांना निरखून घेण्याची टीम इंडियासाठी अखेरची संधी आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानला हलक्यावर घेऊन चालणार नाही. कारण या स्पर्धेत अफगाणिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशला चांगलेच दणके दिले. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघही धोकादायक ठरला आहे. या मालिकेचा शेवट विजयाने करण्याचं ध्येय अफगाणिस्तानचं असेल. गुणतालिकेत सध्या अफगाणिस्तान तळाला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशकडे 2-2 गुण आहेत. जर अफगाणिस्तानने आजचा सामना जिंकला, तरीही ते फायनलमध्ये जाणं शक्य नाही. कारण भारताने आधीच फायनलमध्ये धडक दिली आहे, तर आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल. जर पाक-बांगलादेश यांच्यातील सामना रद्द जरी झाला तरी दोघांना एक-एक गुण मिळेल आणि ज्याचं रन रेट जास्त, तो फायनलमध्ये खेळेल. या अंकगणितामध्ये अफगाणिस्तान कुठेच बसत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी फायनलचं दार बंद आहे. अफगाणिस्तानची गोलंदाजी दरम्यान आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना अफगाणिस्तानच्या धोकादायक गोलंदाजीचा सामना करायचा आहे. अफगाणिस्तानकडे चकवा देणारे फिरकीपटू आहेत. राशिद खान हा त्यांचा हुकमी एक्का आहे. याशिवाय मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी यांची गोलंदाजीही धारदार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज या गोलंदाजीचा सामना कसा करतात ते पाहावं लागेल. भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप कर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, दीपक चहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद. अफगानिस्तान : असगर अफगान (कर्णधार), मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), रहमत शाह, इंसानउल्लाह जनत, हशतमुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी, गुलबादिन नाइब, राशिद खान, अफताब आलम, मुजीब उर रहमान, जावेद अहमदी, मुनीर अहमद, नाजीबुल्लाह जादरान, सायेद शिरजाद, वफादार मोमंद आणि शमिउल्लाह शेनवारी.

महत्त्वाच्या बातम्या

Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप
अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप
Dada First Look Out: सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी संतापले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'
सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी वैतागले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'
Ind vs Eng 3rd T20 : चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!
चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!
IND vs ENG 3rd T20 : कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...
कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Embed widget