एक्स्प्लोर

Asia cup 2018 : बांगलादेशकडून श्रीलंकेचा धु्व्वा

आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला 137 धावांनी पराभूत केलं. बांगलादेशने पहिली फलंदाजी करत श्रीलंकेला 262 धावाचं लक्ष दिलं होतं.

दुबई : आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला 137 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशने पहिली फलंदाजी करत श्रीलंकेला 262 धावाचं लक्ष दिलं होतं. मात्र बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाचा निभाव लागला नाही आणि अवघ्या 124 धावांत श्रीलंकेचा संघ ऑल आऊट झाला.

बांगलादेशच्या जलद आणि फिरकीपटू गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या खेळाडूंना खेळपट्टीवर टीकूच दिलं नाही. आठव्या स्थानी खेळायला आलेल्या दिलरुवान परेराने श्रीलंकेकडून सर्वाधिक 29 धावा केल्या, तर सलामीला आलेल्या उपुल थरगाने 27 धावा केल्या. लंकेच्या सहा फलंदाजांना तर दुहेरी आकडही गाठता आला नाही. त्यामुळे बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी अवस्था केविलवाणी झाली होती.

बांगलादेशकडून कर्णधार मशरफे मोर्तजा, मेहंदी हसन आणि मुस्तफिकूर रहमान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर रुबेल हुसेन, मोसद्दक हुसेन आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी मुश्फीकुर रहीमच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर 262 धावांचं आव्हान श्रीलंकेपुढे ठेवलं. मुश्फीकुर रहीमने 150 चेंडूत 144 धावा ठोकत श्रीलंकेसमोर एक कडवं आव्हान उभं केलं. श्रीलंकेच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा फायदाही बांगलादेशला झाला, सामन्यात श्रीलंकेने अनेक कॅच सोडल्या.

मुश्फीकुरने तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद मिथुनच्या मदतीने 132 धावांची भागिदारी केली. मिथुनने 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत मुश्फीकुरला उत्तम साथ दिली. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने चार विकेट घेतल्या, तर धनंजय डी सिल्वाने दोन विकेट घेतल्या. सुरंगा लकमल, अमिला अपोंसो आणि थिसारा परेराला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या

India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Ind vs Eng 3rd T20I : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल! फुटबॉल इतिहासातील भारी मॅच; मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक
शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल! फुटबॉल इतिहासातील भारी मॅच; मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Embed widget