एक्स्प्लोर

मी कुठे आहे आणि काय करतोय हे कोहलीला माहित होतं : नेहरा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना वगळण्यात आलं आहे. तर 38 वर्षीय आशिष नेहराला संधी देण्यात आली.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. जवळपास 8 महिन्यानंतर 38 वर्षीय आशिष नेहराचं पुनरागमन झालं आहे. तर सुरेश रैना, युवराज सिंह आणि अमित मिश्रा यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा लागली आहे. ''अखेरचा टी-20 सामना खेळल्यानंतर मी कुठे होतो हे कुणाला माहित नसेल. मात्र निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहलीला ते चांगलं माहित होतं. दुखापतीतून सावरल्यानंतर फिटनेसवर काम केलं. पुनरागमनासाठी आवश्यक ती सर्व तयारी करत होतो'', असं नेहराने निवडीनंतर सांगितलं. ''टीकेची कधीही चिंता करत नाही. मी कुठे आहे हे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमला माहित असतं. हे निवड समितीलाही माहित असतं आणि कोहलीलाही. मी संघात आहे, तर निश्चितच काही तरी योगदान देत असेल'', असंही नेहरा म्हणाला. ''वयाचा जास्त विचार करत नाही. पुढच्या तीन सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आशिष नेहरा चांगला खेळला तरी ती बातमी होते आणि नाही खेळला तरी ती बातमी होते'', असंही त्याने सांगितलं. 7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. तर 38 वर्षीय आशिष नेहराला संधी देण्यात आली. नेहराने अखेरचा सामना फेब्रुवारी 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तर विकेटकीपर दिनेश कार्तिकलाही संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग चार अर्धशतकं ठोकणाऱ्या अजिंक्य रहाणेलाही टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्याऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर रवींद्र जाडेजाला पुन्हा एकदा संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. सलामीवीर केएल राहुलला टी-20 संघात स्थान देण्यात आलं आहे. टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेलं नाही. शिवाय अनेक दिवसांपासून संघातून बाहेर असलेल्या सुरेश रैनाचीही यावेळी निराशा झाली आहे. संबंधित बातमी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Embed widget