एक्स्प्लोर

इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात, 1972 नंतर पहिल्यांदाच अॅशेस मालिका अनिर्णित

केनिंग्टन ओव्हलवरच्या पाचव्या आणि अखेरच्या अॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात करुन मालिका 2-2 अशी बरोबरीत राखली. 1972 नंतर अॅशेस मालिका अनिर्णित राहण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

लंडन : केनिंग्टन ओव्हलवरच्या पाचव्या आणि अखेरच्या अॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात करुन मालिका 2-2 अशी बरोबरीत राखली. मात्र गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडेच अॅशेसचा मान कायम राहिला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीचच्या भेदक आक्रमणामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 263 धावांत आटोपला. ब्रॉड आणि लीचने प्रत्येकी चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर ज्यो रुटने दोन विकेट्स घेतल्या. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडमध्ये 18 वर्षांनंतर अॅशेस मालिका जिंकण्याचं स्वप्नं अधुरं राहिलं.

इंग्लंड - 294 (पहिला डाव) आणि 329 (दुसरा डाव) ऑस्ट्रेलिया - 225 (पहिला डाव) आणि 263 (दुसरा डाव)

वेडची शतकी खेळी व्यर्थ

399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने झुंजार शतकी खेळी साकारली. त्याने 166 चेंड़ूत 17 चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी उभारली. पण ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. वेडचे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं.

https://twitter.com/ICC/status/1173310529978417154

47 वर्षांनंतर अॅशेस मालिका अनिर्णित 1972 नंतर अॅशेस मालिका अनिर्णित राहण्याची ही पहिलीच वेळ ठरली. याआधी 1972 साली इंग्लंडमध्येच खेळवण्यात आलेली मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. अॅशेसच्या आजवरच्या इतिहासात केवळ सहाच मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत.

अनिर्णित अॅशेस मालिका

1938 - 1-1 1962/63 - 1-1 1965/66 - 1-1 1968 - 1-1 1972 - 2-2 2019 - 2-2

स्टीव्ह स्मिथला मालिकावीराचा बहुमान

यंदाच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने धावांचा अक्षरश: रतीब घातला. बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे झालेली बंदीची शिक्षा संपल्यानंतर स्मिथनं कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केलं. त्यानं या मालिकेत चार कसोटीत 774 धावांचा रतीब घातला. स्मिथची यंदाच्या अॅशेस मालिकेतली कामगिरी

सामने - 4 डाव - 7 धावा - 774 सरासरी - 110.57 शतकं - 3 अर्धशतकं - 3

या कामगिरीमुळे स्मिथला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.

यंदाच्या अॅशेस कसोटींचे निकाल पहिली कसोटी (बर्मिंगहॅम) - ऑस्ट्रेलिया 251 धावांनी विजयी

दुसरी कसोटी (लीड्स) - अनिर्णित

तिसरी कसोटी (लॉर्डस) - इंग्लंड एका विकेटने विजयी

चौथी कसोटी (मॅन्चेस्टर) - ऑस्ट्रेलियाची 185 धावांनी सरशी

पाचवी कसोटी (केनिंग्टन ओव्हल) - इंग्लंड 135 धावांनी विजयी

महत्त्वाच्या बातम्या

राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget