एक्स्प्लोर
विराटचा पराभव होताना अनुष्काची अवस्था ‘अशी’ झाली होती
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील निर्णायक तिसऱ्या सामन्यात सुरुवातीपासूनच इंग्लंडने भारतावर वर्चस्व गाजवलं. त्यामुळे इतर भारतीय चाहत्यांप्रमाणे अनुष्का शर्माचा चेहराही संपूर्ण सामन्यादरम्यान गंभीर झालेला पाहायला मिळाला.
मुंबई : इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला मालिका गमवावी लागली. हा सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असणारी विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही या पराभवाने निराश झाल्याचं पाहायला मिळालं.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील निर्णायक तिसऱ्या सामन्यात सुरुवातीपासूनच इंग्लंडने भारतावर वर्चस्व गाजवलं. त्यामुळे इतर भारतीय चाहत्यांप्रमाणे अनुष्का शर्माचा चेहराही संपूर्ण सामन्यादरम्यान गंभीर झालेला पाहायला मिळाला.
विराट कोहलीकडे भारतीय संघाचं वनडेतील कर्णधारपद गेल्यानंतर भारताचा वनडे मालिकेतील हा पहिलाच पराभव आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग सहा वनडे मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. दरम्यान, तिसऱ्या वनडे सामन्यात सुरुवातीपासूनच इंग्लंडने भारतीय संघाला सामन्यात डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 256 धावा केल्या. भारताने दिलेले हे लक्ष्य इंग्लंडने आठ विकेट्स राखून सहज पूर्ण केलं. इंग्लंडकडून जो रुटने शतकी खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement