Anam Mirza on Saniya Mirza : टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि क्रिकेटर शोएब मलिकच्या नात्यात अंतर पडलय. शोएब मलिकने शनिवारी (दि.21) तिसरा विवाह केलाय. त्यामुळे सानिया मिर्झाच्या आयुष्याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आता सानिया मिर्झाची बहिण तिच्यासाठी मैदानात उतरली आहे. "तिला तिचे खासगी आयुष्य जगू द्या", असे आवाहन अनम मिर्झा हिने केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
अनम मिर्झा म्हणाली, "सानियाने तिचे व्यक्तिगत आयुष्य लोकांपासून वेगळे ठेवले आहे. मात्र, आता तिला शोएब आणि ती वेगळे होणार आहेत, हे जाहिरपणे सांगणे क्रमप्राप्त आहे. तिने शोएबला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. तिच्या आयुष्यातील ही संवेदनशील वेळ आहे. त्यामुळे मी चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करते की, तिचे हे खासगी आयुष्य आहे. तिला व्यवस्थितपणे राहू द्या", असे आवाहन सानियाच्या बहिनीने केले आहे.
सानियाचे वडिल काय म्हणाले?
सानिया मिर्झाचे वडिल इम्रान मिर्झा यांनी शोएबच्या तिसऱ्या लग्नाबाबत आणि घटस्फोटाबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, दोघेही संमतीने वेगळे झाले आहेत. हा "खुला" आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिका सना जावेदला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. शोएब मलिकने गेल्या वर्षी सना जावेदला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. दरम्यान, विवाह झाल्यानंतर सना जावेदने इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे नावही बदलले आहे. 'सना शोएब मलिक' असे नाव तिने इन्स्टाग्राम अकाऊंटला दिले आहे. शोएब मलिकचा हा तिसरा विवाह आहे.
सानियाच्या वडिलांनी सांगितलेला 'खुला' काय असतो?
कुराण आणि हदीसमधील नियमांनुसार, घटस्फोट आणि खुला यामध्ये मोठा फरक नसतो. एखादी महिला जेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेते. तेव्हा त्याला खुला म्हटले जाते. तर वेगळे होण्याचा निर्णय पुरुषाने घेतला तर त्याला 'तलाक' म्हटले जाते. 'तलाक' घेतल्यानंतर महिला सलग 3 महिने आपल्या पतीच्या घरी राहते. कुराण आणि हदीसमध्ये याचा उल्लेख आहे. सानियाच्या वडिलांनी स्पष्ट केलय की, तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच हा खुला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या