गोंदिया:  गोंदिया (Gondia)  जिल्ह्यातील खमारी येथील चिंदू गायधने हे श्रीराम विद्यालयात परिचर पदावर नोकरी करत होते.  त्यांना त्याच शाळेत कर्तव्यावर असलेल्या भांगे गुरुजीचे वडील हे स्वतः दर दिवशी वेळेत वेळ काढून जय श्रीरामचा (Ram Mandir)  जप आपल्या रजिस्टरमध्ये लिहून काढत त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली.  1966 साली  म्हणजे  तब्ब्ल 58 वर्षाआधी चिंदू गायधने यांनी देखील फावल्या वेळेत जय श्रीराम, जय श्रीरामचा एकच नारा 58 वर्षात एक नव्हे दोन नव्हे तर तब्ब्ल 4 लक्ष 8 हजार 481 वेळा आजपर्यंत लिहून काढला. फक्त लिहलाच नाही तर येणाऱ्या पिढीला याची आठवण व्हवी आणि पुन्हा एकदा राम राज्य निर्माण व्हावे म्हणून जय श्रीराम जय श्रीराम लिहून ठेवेलेले शेकडो  रजिस्टर सांभाळून ठेवले आहेत.


 चिंदू गायधने यांनी 3 डिसेंबर 1992 ला अयोध्येतील बाबरी मशिद पडण्याच्या कामात देखील हजेरी लावत कार सेवक होण्याचा मान मिळावी.  तर अयोधतून परत येताना रेल्वे गाडीच्या डब्यात जागा मिळाली नाही म्हूणन रेल्वे गाडीच्या दोन डब्याला जोडणाऱ्या काप्लिंवर बसून गोंदियाला परत आले. हा थरारक प्रसंग त्यांनी सांगितला. तर दुसरीकडे  आज राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे सांगत लवकरचं अयोध्येत तयार करण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे सांगतात. जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत जय श्रीराम जय श्रीराम चा नारा लिहण्याचा छंद जोपसणार असल्याचे चिंदू गायधने यांनी सांगितले आहे.


राम मंदिर बनण्याचा स्वप्न पूर्ण 


 तर आमच्या वडिलांनी बाबरी मशिद पाडण्यात आपला हातभार लावला आहे.  आज त्याचा राम मंदिर बनण्याचा स्वप्न पूर्ण झाला असून राम मंदिर सर्व सामान्य लोकांसाठी खुला होताचा आपल्या वडिलांना अयोध्येत तयार करण्यात आलेल्या राम मंदिराचे दर्शन घडवून आणणार असल्याचे सांगितले आहे. तर त्यांच्या या कारयाची दखल खमारी गावातील नागरिकांनी घेत गावात असलेल्या राम मंदिराचे अध्यक्ष पद 11 वर्षे त्यांना दिल्याचे त्यांचा मुलगा कुलदीप सांगतो. 


राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न


उद्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. प्राणप्रतिष्ठेआधी सुरु झालेल्या पूजाविधीचा आजचा सहावा दिवस आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राममंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजले आहे. राममंदिराची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झालीए... उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7 हजार 140 निमंत्रक येणार आहेत.  उद्याच्या सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतूर आहे. उद्या या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार आहे. 


हे ही वाचा :


Ram Temple : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा, शिव मंदिरात दर्शन; कसा असेल पंतप्रधानांचा कार्यक्रम? जाणून घ्या