Deepika In Bollywood : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने 'ओम शांती ओम' (Om Shanti Om) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. दीपिका सध्या हृतिकसोबतच्या फायटर सिनेमातील बोल्ड सीनमुळे चर्चेत आली आहे. फायटर सिनेमात अनेक इंटीमेट सीन्स आहेत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टीझरमध्ये दीपिका पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अंदाजात दिसली आहे. फायटर रिलीज होण्यापूर्वी दीपिकाने (Deepika Padukone) अशाच प्रकारे अनेक बोल्ड सीन दिले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात..


1. गेहराईयां  


बॉलिवूडच्या गेहराईयां (Gehraiyaan) या सिनेमामुळे दीपिका चर्चेत राहिली. या सिनेमात दीपिकाने सिद्धांत चतुर्वेदीसोबत बोल्ड आणि इंटीमेट सीन दिलेले होते. सिनेमातील तिच्या सीनमुळे सोशल मीडियावरुन तिच्यावर टीकाही करण्यात येत होती. हा सिनेमाला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नव्हता. 






2. पठाण 


2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या पठाण (Pathan) वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. भगव्या कलरच्या बिकनीमुळे दीपिका ट्रोल झाली होती. बेशरम रंग या गाण्यातील तिच्या बोल्ड सीन्समुळे लोकांनी दीपिकाला प्रचंड ट्रोल केले होते. दीपिकाने या गाण्यात बोल्ड आऊटफिट परिधान केले होते. डान्स स्टेपमुळेही गाण्याची चर्चा रंगली होती. 


3. रासलीला-रामलीला 


दीपिकाच्या सुपरहिट सिनेमांमध्ये रामलीलाचाही समावेश आहे. बॉलिवूडमधील जोडी दीपिका आणि रणवीर सिंहने यामध्ये बोल्ड सीन दिले होते. 'अंग लगा दे' हे गाणे तुफाण चर्चेत आले होते. संजय लीला भंसाळीने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. 


4. तमाशा 


दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर अनेक सिनेमे केले आहेत. दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडते. तमाशा सिनेमातील बोल्ड आणि किसिंग सीनमुळे दीपिका चर्चेत होती. हा सिनेमा इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केला होता. 






5.  रेस 2


अभिनेता सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण रेस 2 मध्ये एकत्र दिसले होते. या दोघांमध्येही इंटीमेट सीन होते. दीपिकाचे बोल्ड सीन पाहिल्यानंतर चाहतेही थक्क झाले होते. आब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 






 


इतर महत्वाच्या बातम्या 


Article 370 Teaser : आर्टिकल 370 चा टीझर आऊट, दहशतवाद्यांचा खात्मा करताना दिसणार यामी गौतम