मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर अजित आगरकरची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सीनियर आणि 23 वर्षांखालील वयोगटासाठीच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगरकरने 191 वन डे सामन्यांमध्ये 1269 धावा आणि 288 विकेट्स अशी कामगिरी बजावली आहे. त्याच्या नावावर 26 कसोटी सामन्यांमध्ये एका शतकासह 571 धावा आणि 58 विकेट्स आहेत.
अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत निलेश कुलकर्णी, जतीन परांजपे आणि सुनील मोरे यांचा समावेश आहे.
मुंबईच्या 19 वर्षांखालील वयोगटासाठीच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे राजेश पवार आणि अतुल रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.