मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरु झालेल्या हायटेक तेजस एक्स्प्रेसला गणेशोत्सवाच्या काळात चांगलीच मागणी आहे. 25 ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी असून, त्यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी तेजस एक्स्प्रेसची तिकिटे 'फुल्ल' झाली आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणातील रहिवाशी मोठ्या संख्येने गावी जातात. त्यामुळे दरवर्षी कोकण आणि मध्य रेल्वेला जादा गाड्या सोडाव्या लागतात. पण यंदा नव्याने सुरु झालेल्या हायटेक तेजस एक्सप्रेसकडे गणेशभक्तांचा ओढा दिसून येत आहे. गणेशोत्सवानिमित्त 25 रोजीपर्यंतचं बुकिंग फुल्ल झाल्यामुळे त्या दिवशीची प्रतीक्षा यादी 145 पर्यंत गेली आहे. तर दुसरीकडे 21 ऑगस्टची काही तिकिटं अद्याप उपलब्ध असली, तरी येत्या आठ ते दहा दिवसांत ही तिकिटेही संपतील, असा दावा रेल्वेच्या वतीनं केला जात आहे. दरम्यान, ही गाडी सुरु झाल्यापासून याचं तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आहे. या गाडीला पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. गेल्या 21 मे रोजी रविवारी सकाळच्या सुमारास केवळ सहा तासांत पुढील चार महिन्यांतील हजारो तिकिटांची विक्री झाली होती. असे आहेत तेजसचे तिकीट दर
मार्ग एसी चेअर (जेवणासह) एसी चेअर (जेवणाशिवाय) एक्झिक्युटिव्ह (जेवणासह) एक्झिक्युटिव्ह (जेवणाशिवाय)
सीएसटी-रत्नागिरी 1940 1785 955 835
सीएसटी-कुडाळ 2495 2340 1200 1080
सीएसटी- करमाळी 2740 2585 1310 1185
दादर-रत्नागिरी 1915 1760 940 815
दादर-कुडाळ 2475 2320 1190 1070
दादर-करमाळी 2725 2570 1295 1175
ठाणे-रत्नागिरी 1820 1665 905 780
ठाणे-कुडाळ 2425 2270 1170 1050
ठाणे-करमाळी 2680 2575 1280 1155
  संबंधित बातम्या

तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला

अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल

हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट

केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा… हायटेक ‘तेजस’ सज्ज!

मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!