एक्स्प्लोर

कसोटी संघ निवडीपूर्वीच भारताचे दोन दिग्गज इंग्लंडमध्ये दाखल

मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे वोरसेस्टरच्या काऊंटी ग्राऊंडमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळतील.

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे भारतीय अ संघ इंग्लंड लॉयन्सच्या विरोधात चार दिवसीय सामना खेळत असेल, तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वन डे मालिका जिंकण्यासाठी रणनीती आखत असेल अशा परिस्थितीत संघाची निवड होणार आहे. निवडकर्त्यांनी सलामीवीर फलंदाज मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांना अगोदरच इंग्लंडला पाठवलं आहे. दोघांचीही कसोटी संघातील जागा पक्की आहे. मात्र त्यापूर्वी दोघांना सराव सामन्याची गरज आहे. मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे वोरसेस्टरच्या काऊंटी ग्राऊंडमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळतील. भारतीय अ संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा चार दिवसीय सामना जिंकून मालिका 1-0 ने जिंकली. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा करुण नायर या संघाचं नेतृत्त्व करत आहे. या संघात आता भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयही खेळताना दिसतील. या दोघांचंही पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळेच त्यांना पुढे पाठवलं आहे, जेणेकरुन तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल. एक ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रहाणे आणि मुरली विजयला अगोदरच इंग्लंडमध्ये बोलवून घेण्यामागे विराट कोहलीचा तो हेतू आहे, जो त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बोलून दाखवला होता. परदेश दौऱ्याच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळण्याची मागणी त्याने केली होती. विराटच्या या मतावर सीओए प्रमुख विनोद राय यांनी शिक्कामोर्तब केलं आणि रहाणे आणि मुरली विजयला तयारीसाठी अगोदरच पाठवलं. दरम्यान, भारतीय कसोटी संघाचा नियमित यष्टिरक्षक रिद्धिमान साहा अजूनही फिट झाला नसल्यामुळे बोर्डाने दिनेश कार्तिकला इंग्लंडमध्येच थांबायला सांगितलं असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात बॅकअप यष्टिरक्षक म्हणून भारतीय अ संघाकडून सध्या इंग्लंडमध्येच खेळत असलेल्या ऋषभ पंतचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. संबंधित बातमी : कसोटी मालिकेसाठी संघ निवडीत राहुल द्रविडचीही मोलाची भूमिका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget