एक्स्प्लोर

India tour of South Africa : दक्षिण आफ्रिका संघातही भूकंप झालाच! भारताविरुद्ध एकाचवेळी टी-20 आणि वनडे संघात मोठा बदल

India tour of South Africa : गेराल्ड कोएत्झी, मार्को जॅन्सन आणि लुंगी एनगिडी हे देखील पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्येच खेळतील. यानंतर हे पाच खेळाडू कसोटी तयारीसाठी देशांतर्गत खेळतील.

India tour of South Africa : भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. भारत या दौऱ्यात टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेने तिन्ही फॉरमॅटसाठी आपला संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद भूषवणारा खेळाडू टेंबा बावुमाला वनडे टी-20 संघातून वगळण्यात आलं आहे.भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वनडे कर्णधार टेंबा बावुमा आणि अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांना वगळलं आहे.

बवुमाच्या जागी टी-20 कर्णधार एडन मार्करम एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल. गेराल्ड कोएत्झी, मार्को जॅन्सन आणि लुंगी एनगिडी हे देखील पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्येच खेळतील. यानंतर हे पाच खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीसाठी 14 ते 17 डिसेंबर दरम्यान देशांतर्गत प्रथम श्रेणी सामन्यात दिसतील. युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला प्रथमच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षक फलंदाज काइल वॉरेन कसोटी संघात पुनरागमन करत आहे. हेनरिक क्लासेनला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्खी अजूनही पूर्णपणे बरा झाला नसल्याने निवडीसाठी उपलब्ध नव्हता.

बावुमाला संघातून वगळले

नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकात टेम्बा बावुमाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व केले आणि संपूर्ण विश्वचषकात त्याच्या संघाने चांगली कामगिरी केली, परंतु कर्णधार टेंबा बावुमा स्वत: चांगली कामगिरी करू शकला नाही. बावुमाला एकदिवसीय किंवा टी-20 मध्ये स्थान मिळालेले नाही, परंतु त्याला कसोटी संघात स्थान मिळाले आहे आणि त्याच्याकडे कर्णधारपदही देण्यात आले आहे. आता बावुमा फक्त कसोटी फॉरमॅटमध्येच खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद एडन मार्करमकडे सोपवण्यात आले असून, आता कदाचित येत्या काही महिन्यांत मार्कराम वनडे संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. बावुमा हा सलामीवीर फलंदाज आहे. संपूर्ण विश्वचषकात क्विंटन डी कॉकसोबत सलामीला आला, पण एकाही सामन्यात त्याला योग्यरित्या जबाबदारी पार पाडता आली नाही. 

विश्वचषक संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका भारताच्या यजमानपदासाठी सज्ज झाली आहे. यादरम्यान प्रथम टी-20 आणि नंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. वनडे मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे. तर दुसरा एकदिवसीय सामना 19 डिसेंबर रोजी गाकीबेरा येथे खेळवला जाईल आणि तिसरा एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळवला जाईल.

दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ

एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर दुसेन, कायले व्हेरीन, लिझाद विल्यम्स 

Aiden Markram (captain), Ottniel Baartman, Nandre Burger, Tony de Zorzi, Reeza Hendricks, Heinrich Klaasen, Keshav Maharaj, Mihlali Mpongwana, David Miller, Wiaan Mulder, Andile Phehlukwayo, Tabraiz Shamsi, Rassie van der Dussen, Kyle Verreynne and Lizaad Williams.

दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ 

एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेनलूकवायो,तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विल्यम्स.

Aiden Markram (captain), Ottniel Baartman, Matthew Breetzke, Nandre Burger, Gerald Coetzee, Donovan Ferreira, Reeza Hendricks, Marco Jansen, Heinrich Klaasen, Keshav Maharaj, David Miller, Lungi Ngidi, Andile Phehlukwayo, Tabraiz Shamsi, Tristan Stubbs and Lizaad Williams.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ 

टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, के ट्रिस्टन स्टब्स आणि व्हेरीन.

Test squad: Temba Bavuma (captain), David Bedingham, Nandre Burger, Gerald Coetzee, Tony de Zorzi, Dean Elgar, Marco Jansen, Keshav Maharaj, Aiden Markram, Wiaan Mulder, Lungi Ngidi, Keegan Petersen, Kagiso Rabada, Tristan Stubbs and Kyle Verreynne.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Team India : विराट कोहली रोहित शर्मासह 6 खेळाडू फिक्स, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असणार? 
विराट कोहली रोहित शर्मासह 6 खेळाडू फिक्स, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असणार? 
Team India : भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget