एक्स्प्लोर

वर्ल्डकपसाठीच्या संघात निवड झाल्यानंतर चार तासांत रवींद्र जडेजाचा भाजपाला पाठिंबा जाहीर

गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरल्यानंतरही अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाची पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरल्यानंतरही अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाची पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. जडेजाच्या निवडीनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु विश्वचषकासाठीच्या संघात निवड झाल्यानंतर अवघ्या चार तासात रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. जडेजाने भाजपला पाठिंबा घोषित केल्यानंतर जडेजाच्या या निवडीमागे भाजप कनेक्शन आहे का? असा सवाल अनेक क्रीडारसिंकांनी उपस्थित केला आहे. याआधी अष्टपैलू क्रिकेटर म्हणून रवींद्र जडेजाने चांगेल प्रदर्शन केले आहे. परंतु जडेजा गेल्या वर्षभरापासून आऊट ऑफ फॉर्म आहे, अशी त्याच्यावर टीका होत आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिकेतही त्याला संघातून वगळण्यात आले होते. परंतु हार्दिक पंड्यानं माघार घेतल्यामुळे जडेजाला संधी देण्यात आली. त्याला तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यामध्येही त्याने क्रिकेटरसिकांना नाराज केले होते. त्यामुळे जडेजाची निवड सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे. जडेजाने ट्वीट करुन भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जडेजाचे ट्वीट रीट्वीट करत त्याचे आभार मानले आहेत. तसेच वर्ल्डकपसाठी संघात निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदनही केले आहे. VIDEO | विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड | एबीपी माझा विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget