R Madhavan Son News : अभिनेता आर. माधवनचा (R Madhavan) 16 वर्षीय मुलगा वेदांत माधवन (Vedaant Madhavan) हा एक राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून त्याने आतापर्यंत 7 पदकं जिकली आहेत. महाराष्ट्र राज्याकडून खेळणापा वेदांत आता ऑलिम्पिक 2026 ची (Olympic Games in 2026) तयारी करत आहे. पण या भव्य स्पर्धेच्या तयारीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वीमिंग पूल लागत असून मुंबईतील जलतरण तलाव कोरोनाच्या संकटामुळे बंद आहेत. त्यामुळेच माधवन कुटुंबासोबत दुबईला शिफ्ट झाला आहे.


याबद्दल बोलताना माधवन म्हणाला, “मुंबईतील मोठे जलतरण तलाव हे कोरोनाच्या संकटामुळे सध्या बंद आहेत. त्यामुळे वेदांतच्या सरावासाठी आम्ही दुबईला शिफ्ट झालो आहतो. तो सध्या ऑलिम्पिक खेळांची तयारी करत असून मी आणि पत्नी सरीता त्याच्यासोबत आहोत.'' माधवनने ही माहिती बॉलिवुड हंगामा या चॅनेलशी बोलताना दिली. यावेळी तो ''मी आणि पत्नी सरीता वेदांतसोबत कायम आहोत, तो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पदकं जिंकत असल्याने आम्ही आनंदी असून आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.'' असंही म्हणाला.


मला त्याचं करीअर अधिक महत्त्वाचं


यावेळी बोलताना माधवनने इतर पालकांना एक सल्लाही दिला. तो म्हणाला, ''तुमच्या मुलाला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे, ते त्याला करु द्या. माझा मुलगा माझ्याप्रमाणे अभिनेता नाही झाला याचं मला अजिबात वाईट वाटत नसून उलट मला आता माध्या करीयरपेक्षा त्याचं करीयर महत्त्वाचं आहे.'' 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha