एक्स्प्लोर

कोण म्हणतं एबी डिव्हिलिअर्स थकला?

आयपीएलच्या मैदानात डिव्हिलिअर्सने हवेत उडी मारुन पकडलेला झेल पाहून तो थकलाय, असं कोण म्हणेल, हाच प्रश्न पडतो.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. आपण दमल्याचं सांगत एबीने निवृत्ती जाहीर केली, मात्र आयपीएलच्या मैदानात डिव्हिलिअर्सने हवेत उडी मारुन पकडलेला झेल पाहून तो थकलाय, असं कोण म्हणेल, हाच प्रश्न पडतो. डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. एबी डिव्हिलियर्सनं सीमारेषेवर अॅलेक्स हेल्सचा झेल पकडून आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम जणू लागूच होत नाही, असं दाखवून दिलं. हवेत उंच उडी घेऊन झाडावर लटकणारा आंबा तोडावा, तसा डिव्हिलियर्सनं झेल पकडला. त्यामुळे बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीनं डिव्हिलियर्सला चक्क स्पायडरमॅनची उपमा दिली. एबी डिव्हिलियर्सला मिस्टर थ्री सिक्स्टी का म्हणतात याची प्रचिती आयपीएलच्या रणांगणात पुन्हा आली. त्याच सामन्यात डिव्हिलियर्सनं अवघ्या 39 चेंडूंत 69 धावांची खेळी करताना चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू पोहचवला. एबीच्या या खेळीला बारा चौकार आणि एका षटकाराचा साज होता. पण विशेष म्हणजे बंगळुरुने हैदराबादवर मिळवलेल्या सनसनाटी विजयात डिव्हिलियर्सची ही खेळी निर्णायक ठरली. डिव्हिलियर्सनं 2004 साली दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली त्यानं दिली. डिव्हिलियर्सनं 114 कसोटी, 228 वन डे आणि 78  ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय का घेत आहोत, हे एका व्हिडीओद्वारे ट्विटरवर जाहीर केलं. "मी आता कंटाळलो आहे. शिवाय तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे या क्षणापासूनच मी क्रिकेटला अलविदा करत आहे" असं डिव्हिलियर्स म्हणाला. एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वन डे कामगिरी सामने – 228 धावा – 9577 शतकं – 25 अर्धशतकं – 53 कसोटी कामगिरी सामने – 114 धावा – 8765 शतकं – 22 अर्धशतकं – 46 टी-20 कामगिरी सामने – 78 धावा – 1672 शतकं – 0 अर्धशतकं - 10
संबंधित बातमी :
ए बी डिव्हिलियर्सची धक्कादायक निवृत्ती!

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Team India Hockey Jersey Controversy : लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Embed widget