एक्स्प्लोर

INDvsNZ : भारताची न्यूझीलंडवर 7 विकेट्सनी मात, मालिकेत बरोबरी

भारतीय संघाला सलामीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 80 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

ऑकलंड : न्यूझीलंड दौऱ्यातील दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा आठ विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली आहे. भारताने किवींचा डाव निर्धारित 20 षटकांमध्ये 158 धावांमध्ये गुंडाळला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान होतं. भारताने हे आव्हान 18.5 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला. रोहितने 29 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 50 धावा फटकावल्या. तर धवनने 30 धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयाचा पाया घातला. त्यानंतर रिषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. INDvsNZ : भारताची न्यूझीलंडवर 7 विकेट्सनी मात, मालिकेत बरोबरी या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्रभावी गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला ऑकलंड ट्वेन्टी 20 सामन्यात 8 बाद 158 धावांचीच मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांनी आजच्या सामन्यात किवी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. पण कॉलीन डी ग्रॅण्डहोम आणि रॉस टेलरच्या 77 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. कॉलिनने 28 चेंडूत 50 आणि टेलरने 36 चेंडूत 46 धावांची खेळी उभारली. भारताकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक तीन फलंदाजांना माघार धाडलं. खलील अहमदने दोन तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. INDvsNZ : भारताची न्यूझीलंडवर 7 विकेट्सनी मात, मालिकेत बरोबरी न्यूझीलंडने वेलिंग्टनचा पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली होती. त्यामुळे या मालिकेतलं आव्हान राखायण्यासाठी टीम इंडियाला ऑकलंडमधील सामना जिंकणं गरजेचं होतं. अखेर भारताने हा सामना सात विकेट्सनी जिंकत मालिकेत बरोबरी केली. INDvsNZ : भारताची न्यूझीलंडवर 7 विकेट्सनी मात, मालिकेत बरोबरी भारतीय संघाला सलामीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 80 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. निव्वळ धावांच्या फरकाचा विचार करायचा, तर ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासातला तो सर्वात मोठा पराभव ठरला. भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, विजय शंकर, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, खलील अहमद न्यूझीलंड संघ : केन विलियम्सन (कर्णधार), कॉलिन मुन्रो, टिम सेइफेर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, डार्ल मिचेल, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, मिशेल सँटनर, स्कॉट कुगलेजिन, टिम साउदी, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
IND vs ENG 1st ODI : बर्मिंगहॅममध्ये फिरायला निघाले टीम इंडियाचे खेळाडू; अचानक रस्त्यावर रोहित शर्माला सगळ्यांनी घेरले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
बर्मिंगहॅममध्ये फिरायला निघाले टीम इंडियाचे खेळाडू; अचानक रस्त्यावर रोहित शर्माला सगळ्यांनी घेरले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Eng vs Ind 1st ODI Playing XI : रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Embed widget