या घटनेमुळे मिस्त्री कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साप पकडण्यासाठी कोणतीच घाईगडबड करु नका, असा सल्लाही सर्पमित्रांनी दिला आहे.
2/8
नायगाव परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अवेझ मिस्त्रीला वयाच्या 8 व्या वर्षापासून साप पकडण्याचा छंद होता. परिसरात कुठेही साप दिसला की त्याला पकडण्यासाठी अवेझला फोन येत असे. आजपर्यंत त्याने अनेक विषारी सापांना मोठ्या शिताफीने पकडून जंगलात सोडलं होतं.
3/8
नंतर अवेझ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला. मात्र तोपर्यंत अवेझच्या शरीरात 90 टक्के विष पसरलं होतं. त्यातच उपचारही वेळेवर न मिळाल्यामुळे अखेर अवेझचा मृत्यू झाला.
4/8
जाताना त्या विषारी सापानं अवेझच्या पाठीवरही चावा घेतला. तरीही अवेझनं सापाला पकडून ठेवलं आणि परिसरातील छोट्या खाडीत टाकलं.
5/8
रविवारी नायगाव परिसरात श्रमसाफल्य इमारतीत साप आल्याचं माहित पडल्यावर तो धावत साप पकडण्यासाठी गेला. मात्र या कोब्राला पकडताना त्याने अवेझच्या हातावर चावा घेतला. तरीही न घाबरता त्याने सापाला एका गोणीत भरलं आणि गोणी पाठीवर घेऊन तो निघाला.
6/8
कोब्रा पकडणं एका सराईत सर्पमित्राच्या जीवावर बेतलं आहे. वसईच्या नायगाव परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अवेझ मिस्त्रीचा कोब्राच्या दंशानं मृत्यू झाला आहे.
7/8
ज्याने आजवर अनेक सापांना जीवदान दिलं, त्याचं सापाने त्याचा जीव घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
8/8
विशेष म्हणजे साप पकडण्यासाठी तो कोणतंही हत्यार वापरत नव्हता. अवेझला दोन महिन्यांपूर्वीही अशाचप्रकारे साप चावला होता. मात्र त्यातून तो बचावला होता. मात्र यावेळी त्याला नशिबाने साथ दिली नाही.