Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 25 Jul 2017 09:49 PM (IST)
1/5
शाहरुख खान सध्या त्याचा आगामी सिनेमा जब हॅरी मेट सेजलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्माही दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अलीने केलं आहे.
2/5
बाहुबली सीरिजच्या धर्तीवरच हा सिनेमा बनवला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र या सिनेमाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
3/5
बाहुबली सीरिजच्या यशाने बॉलिवूडच्या निर्मात्यांनाही भुरळ घातली आहे. बॉलिवूड निर्मातेही बाहुबली प्रमाणे सिनेमा बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
4/5
सुत्रांनुसार यशराज बॅनर आणि आकाश चोप्रा यांच्याकडून हा सिनेमा बनवण्याची तयारी सुरु आहे. या प्रोजेक्टवर डिसेंबरपासून काम सुरु केलं जाणार आहे.
5/5
बॉलिवूडमध्ये बाहुबली सारखा सिनेमा बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. किंग खान शाहरुख या सिनेमात असेल, असंही बोललं जात आहे.