मुख्यपृष्ठPhotosजेजुरी गडावर पारंपारिक मर्दानी खेळ, 42 किलोंची तलवार दातांनी उचलली
जेजुरी गडावर पारंपारिक मर्दानी खेळ, 42 किलोंची तलवार दातांनी उचलली
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 02 Oct 2017 02:57 PM (IST)
1/4
42 किलो वजनी तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी 250 वर्षांपूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलली जाते.
2/4
तब्बल 42 किलोंची तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दातात उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा या ठिकाणी रंगते.
3/4
पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर मर्दानी खेळाची स्पर्धा रंगते. 12 वर्षांपासून ते 60 वर्षे वयोगटातील भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.
4/4
महाराष्ट्राचं लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी दरवर्षी पारंपारिक पद्धतीने ‘मर्दानी दसऱ्याचं’ आयोजन करण्यात येतं. तब्बल 15 तासांपेक्षाही जास्त काळ हा सोहळा गडावर संपन्न झाला. (सर्व फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)