एक्स्प्लोर
ढोल-ताशांच्या गजरात स्वागत, भुजबळांच्या नाशिक दौऱ्याचे फोटो
1/12

मंगळवारी 19 जूनला सकाळी 11 वाजता नाशिकहून मुंबईला जातील.
2/12

तिथे दर्शन घेतल्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज समाधीचं दर्शन घेतील आणि एमईटी कॉलेजला भेट देतील. त्यादिवशीचा मुक्कामही नाशिकलाच असेल.
3/12

भुजबळ सोमवारी 18 जूनला सकाळी दहा वाजता नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत.
4/12

रविवारी 17 जून रोजी सकाळी दहा वाजता सप्तश्रृंगी गडावर जाऊन ते देवीचं दर्शन घेतील. त्यानंतर नाशिकला मुक्काम असेल.
5/12

साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर सिन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांची ते भेट घेतील. त्यानंतर नाशिकच्या भुजबळ फार्मवर मुक्काम करणार आहेत.
6/12

शनिवारी 16 जूनला येवला संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ दुपारी दीड वाजता शिर्डीच्या दिशेने रवाना होतील.
7/12

त्यानंतर येवला या त्यांच्या मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. येवल्यातच मुक्काम असेल.
8/12

भुजबळ उद्या जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
9/12

14 ते 19 जून असा सहा दिवसांचा भुजबळांचा नाशिक दौरा आहे.
10/12

भुजबळ समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नाशिकच्या राजकारणावर भुजबळ लवकरच पकड घेतील, असा सूचक इशारा दिला.
11/12

पाथर्डी फाट्यापासून ढोल ताशाच्या गजरात भुजबळांचं स्वागत करण्यात आलं.
12/12

तुरुंगातून जामिनावर मुक्तता झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल झाले.
Published at : 14 Jun 2018 08:20 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या





















