Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 04 Nov 2018 12:00 AM (IST)
1/5
तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वे हॉल) हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्याची देखील राज्यपालांनी सूचना केली आहे. त्यामुळे लोकांना तसेच इतिहासप्रेमींना या तोफा पाहता येणार आहेत.
2/5
राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज संध्याकाळी, क्रेनच्या मदतीने तोफा उचलण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे परिरक्षण करण्याची सूचना केली आहे.
3/5
या तोफांचे वजन प्रत्येकी 22 टन असून, लांबी 4.7 मीटर तर अधिकतम व्यास 1.15 मीटर इतका आहे. आज दोनीही तोफा क्रेनच्या मदतीने 50 मीटर उंच उचलण्यात आल्या आणि त्यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर ठेवण्यात आल्या.
4/5
राजभवन येथे प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच असलेल्या हिरवळीजवळ समुद्राच्या दिशेने तळाशी काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण सुरु असताना कर्मचाऱ्यांना मातीमध्ये दबलेल्या दोन वजनदार तोफा दिसल्या.
5/5
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे प्रत्येकी 22 टन वजनाच्या दोन ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या आहेत. अनेक दशके दुर्लक्षित असलेल्या या तोफा आज क्रेनच्या मदतीने मातीतून बाहेर काढण्यात आल्या.