मुख्यपृष्ठPhotosनृत्य सादर करत कोळी महिलांचा लालबागच्या राजाला निरोप
नृत्य सादर करत कोळी महिलांचा लालबागच्या राजाला निरोप
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 23 Sep 2018 10:28 AM (IST)
1/5
लालबागच्या राजाची मिरवणूक बँड, लेझिम आणि ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट मधून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी इथे जाते.
2/5
3/5
गेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशी. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.
4/5
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत विविध रंग आणि छटा. मिरवणूक मार्ग रांगोळ्यांनी, फुलांच्या आणि पैशांच्या माळांनी सजला. हजारो भाविकांचा उत्साह शिगेला.
5/5
मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष असतं. सकाळी दहाच्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडेल. लालबागच्या राजाची जंगी मिरवणूक हे मुंबईतील गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. लालाबागच्या राजाला निरोप देण्यासाठी कोळी बांधव नृत्य सादर करण्याची जुनी परंपरा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोळी महिलांनी कोळी नृत्य सादर करत लालबागच्या राजाला निरोप अनोखा निरोप दिला आहे.