एक्स्प्लोर
दाऊदच्या 'या' संपत्तीचा लिलाव होणार!
1/6

याआधी, पत्रकार एस बालकृष्णन यांची एनजीओ ‘देश सेवा समिती’ने हॉटेल रौनक अफरोझसाठी 4.28 कोटी रुपयांची सर्वाधिक किमतीची बोली लावली होती. 30 लाखांची अनामत रक्कम भरल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत उर्वरित 3.98 कोटींची रक्कम भरता न आल्यामुळे ती मालमत्ता त्यांच्या हातून निसटली. यावेळी हॉटेल रौनक अफरोझसाठी अनामत रक्कम 6.28 लाखांनी घटवून 23.72 लाख रुपये करण्यात आली आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत 6 ते 8 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.
2/6

याशिवाय मोहम्मद अली रोडवरील शबनम गेस्ट हाऊस, माझगावातील पर्ल हार्बर इमारतीतील एक फ्लॅट, सैफी ज्युबिली स्ट्रीटवरील दादरीवाला चाळीतील एका खोलीचे भाडेकरार अधिकार आणि औरंगाबादमधील 600 चौरस फूट फॅक्टरीचा प्लॉट या मालमत्तांचा लिलाव होईल.
Published at : 19 Oct 2017 12:45 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























