Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 23 Oct 2017 09:51 PM (IST)
1/8
‘सिंघम रिटर्न्स’ने पहिल्याच दिवशी 32.09 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर ‘गोलमाल अगेन’ने 30.14 कोटींचा गल्ला जमवला.
2/8
दरम्यान अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडिचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हा दुसरा सिनेमा आहे.
3/8
अजय देवगण, तुषार कपूर, तब्बू, अरशद वारसी, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि परिणीती चोप्रा यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
4/8
19 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या आमिरच्या सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 4.80 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर 20 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या ‘गोलमाल अगेन’ने 30.14 कोटींचा गल्ला जमवला.
5/8
‘’गोलमाल अगेन’ची टक्कर आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’शी आहे. मात्र ‘गोलमान अगेन’ने या सिनेमावर मात केली आहे.
6/8
या वर्षात सर्वाधिक ओपनिंगचा विक्रम ‘बाहुबली 2’ च्या नावावर आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर बॉलिवूडमध्ये या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ (21.15 कोटी) आहे.
7/8
या सिनेमाने पहिल्याच दिवशी 30.14 कोटींची कमाई केली. या वर्षात एवढी कमाई करणारा बॉलिवूडचा हा पहिलाच सिनेमा आहे.
8/8
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजचा चौथा सिनेमा गोलमाल अगेन रिलीज झाला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे.