Smart Watch : 3000 रुपयांच्या बजेटमध्ये 'हे' स्मार्ट वॉच, यादी पाहा आणि तुम्हीच ठरवा
पण तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये स्मार्ट वॉच घ्यायचं असेल तर, यासाठी चांगले पर्याय आहेत. 3000 रुपयांच्या बजेटमधील काही निवडक स्मार्ट वॉच कोणते, हे जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeatXP Unbound Nova : हे स्मार्ट वॉच Amazon वर 2499 रुपयांना उपलब्ध आहे. याचा लुकही खूपच स्टायलिश आहे. या स्मार्ट वॉचमध्ये 1.96 इंच स्क्रीन, 270 mAh बॅटरी, ब्लूटूथ कॉलिंग, 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड, 24x7 हेल्थ मॉनिटरिंग यासह अनेक फिचर्स आहेत.
Fire-Boltt Visionary : अॅमेझॉनवर त्याची किंमत 2799 रुपये आहे. यात 1.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.
Fire-Boltt Visionary स्मार्ट वॉचमध्ये ब्लूटूथ 5.0 आवृत्ती, तीन तासात पूर्ण चार्ज, AI व्हॉईस असिस्टन्स, IP68 वॉटर रेझिस्टन्स यासह अनेक फिचर्श आणि स्टायलिश लुक आहे.
Cultsport Burn : आकर्षक लुक आणि डिझाइन असलेले हे स्मार्ट घड्याळ सध्या फ्लिपकार्टवर 2,499 रुपये आहे.
यामध्ये 1.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले, AI व्हॉईस असिस्टंट, 24x7 हेल्थ मॉनिटरिंग, फास्ट चार्जिंग, 60 हून अधिक स्पोर्ट मोड्स, 7 दिवसांसाठी बॅटरी बॅकअप यासह इतर अनेक वैशिष्ट्ये उत्तम अनुभव देतात.
OPPO Watch Free : ओप्पो ब्रँडचे हे स्मार्ट वॉच फ्लिपकार्टवर त्याची किंमत 2,999 रुपयांना उपलब्ध आहे.
यामध्ये 1.64 AMOLED डिस्प्ले, 100 पेक्षा जास्त वर्कआउट मोड, 14 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप, AI आउटफिट 2.0 यासह अनेक फिचर्स आहेत.
Huami GTS 2e : Flipkart वर या स्मार्ट वॉचची किंमत सध्या 2,499 रुपये आहे. यात 1.65 इंच, 24 तास हार्ट रेट मॉनिटरिंग, 90 बिल्ट-इन स्पोर्ट्स मोड आहे.
यासोबतच या स्मार्टवॉचमध्ये 5 एटीएम वॉटर रेझिस्टन्स, 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप, इंटरनेट अॅक्सेसशिवाय ऑफलाइन व्हॉइस कंट्रोल फीचर यासह अनेक चांगले फिचर्स आहेत.