Excess Phone use: सावधान! मोबाईलच्या अतिवापरामुळे होतात 'हे' दुष्परिणाम; मोठ्यांसह लहान मुलांचंही होतं नुकसान
मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत फिरायला गेल्यावरही अनेकजण मोबाईलवरच असतात आणि त्यामुळे आपापसातील संवाद तुटतो.
मुलं अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात आणि इंटरनेट वापरतात. त्यामुळे मुलांचं नापास होण्याचं प्रमाण हे वाढतच आहे.
मोबाईलमुळे सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत आणि आळशीपणा वाढला आहे. होम डिलीव्हरीसारख्या पर्यायांमुळे आळस वाढतो.
मोबाईल फोनमध्ये electromagnetic रेडिएशन निघतात, त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार फोनच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असते.
सेलफोनच्या अतिवापरामुळे रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढत आहेत. नियम कितीही कडक केले तरी लोक गाडी चालवताना फोनवर बोलत असतात, त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि अपघाताच्या प्रमाणात वाढ होते.