Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2023: 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'च्या शर्यतीत कोण? विराट कोहलीला या खेळाडूंकडून तगडे आव्हान
आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये या पाच खेळाडूंना दमदार खेळी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वचषक 2023 च्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या शर्यतीमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे.
विराटने या टुर्नामेंटमध्ये 100 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने 765 धावा केल्या आहेत. विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये विराट हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने एका स्पर्धेत 700 धावांचा टप्पा पार केलाय.
या शर्यतीत सहकारी खेळाडू मोहम्मद शमी विराटला सर्वात मोठे आव्हान देत आहे. या भारतीय वेगवान गोलंदाजाने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत फक्त 6 सामने खेळलेत, पण सध्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल ठरलाय. शमीने आतापर्यंत 23 विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजी सरासरी आणि गोलंदाजी स्ट्राईक रेटमध्येही तो नंबर-1 वर आहे. शमीची गोलंदाजीची सरासरी 10 पेक्षा कमी आहे आणि त्याने प्रत्येक 11व्या चेंडूवर एक विकेट घेतली आहे. या विश्वचषकातील 6 सामन्यांत तो तीनदा 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला आहे.
या शर्यतीत भारतीय कर्णधार रोहित शर्माही पुढे येऊ शकतो. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित पाचव्या स्थानावर आहे. त्याने 10 सामन्यात 550 धावा केल्या आहेत.
तो नक्कीच कोहलीच्या 161 धावांनी मागे आहे पण रोहितचा स्ट्राईक रेट 124.15 आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारतीय संघ जवळपास प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात करू शकला आहे. त्याच्या खेळीने संघाची गती निश्चित केली आहे. अशा स्थितीत रोहितला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कारही मिळू शकतो.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाचाही समावेश आहे. या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 5.47 च्या गोलंदाजीची सरासरी आणि 23.45 च्या स्ट्राईक रेटने विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 21.40 राहिला आहे. अहमदाबाद येथे होणाऱ्या फायनलमध्ये फिरकीचा ट्रॅक असू शकतो. अशा परिस्थितीत झाम्पा येथे चमत्कार करू शकतो. त्यामुळेच तो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होण्याचाही दावेदार आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरही येथे स्पर्धा करत आहे. त्याने आतापर्यंत 10 सामन्यांत 528 धावा केल्या आहेत. तो 52.80 च्या सरासरीने आणि 107.53 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोहितप्रमाणेच वॉर्नरनेही कांगारू संघाला सुरुवातीची गती दिली आहे. मात्र, प्लेअर ऑफ द टूर्नामेंटच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी वॉर्नरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यादरम्यान मोठी खेळी खेळावी लागणार आहे.