World Cup 2023 Final, Virat Kohali: हातातली बॅट जणू तळपती तलवार, गोलंदाजांना धडकी भरवतो 'विराट'चा राकट अंदाज
IND vs AUS World Cup 2023 Final: टीम इंडियाचं रनमशिन म्हणजे, विराट कोहली. विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App20 वर्षांपासून हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीनं आठव्यांदा 50 धावसंख्या ओलांडत सचिन तेंडुलकरचा 2003 विश्वचषकातील रेकॉर्ड मोडलाय.
रनमशीन विराट कोहलीने विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. विराट कोहलीने 10 सामन्यात 711 धावांचा पाऊस पाडलाय. विश्वचषकात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजात विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. पण त्याच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम नोंदवला गेलाय.
विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात तब्बल 56 टक्के धावा पळून काढल्या आहेत. म्हणजेच काय तर... विराट कोहली याने यंदाच्या विश्वचषकात एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर जास्त भर दिलाय. त्याचा फायदा टीम इंडियाला झालेला दिसतेय.
विराट कोहलीने एक बाजू लावून धरल्यामुळेच इतर फलंदाजांना विस्फोटक फलंदाजी करत आली. यंदाच्या विश्वचषकात धावून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.
विराट कोहली शानदार प्लेसमेंट आणि टायमिंगसह मैदानाच्या चारी बाजून फटकेबाजी करतो. तो चौकार-षटकार मारण्याऐवजी धावसंख्या हलती ठेवण्याचा प्रयत्न करतो.
प्रत्येक चेंडूवर धाव निघावी, असाच त्याचा प्रयत्न असतो. विराट कोहलीने 56 टक्के धावा या दोन विकेटच्या मध्ये धावून काढल्या आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत 7 किमीपर्यंत धावालाय. चौकार षटकार मारण्याऐवजी विराट कोहली संयमाने धावा वाढवतो.
विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावा काढत यंदाच्या विश्वचषकात 401 धावा केल्या आहेत. तो एकू सात किमीपर्यंत धावला आहे. ज्या खेळपट्टीवर सामना होती त्याची लांबी 17.68 मीटर म्हणजेच 22 फूट इतकी असते.