KL Rahul : बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई मग, दुखापतीचा विळखा; दमदार कमबॅक करणाऱ्या केएल राहुलचा आतापर्यंतचा प्रवास
केएल राहुलला 11 जानेवारी 2019 रोजी बीसीसीआयने निलंबित केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी कॉफी विथ करणमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होतं. त्यानंतर या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत बोलावण्यात आले होते आणि त्यांना निलंबित करून संघाबाहेरही टाकण्यात आले होते.
24 जानेवारी 2019 रोजी बीसीसीआयने केएल राहुलवरील बंदी उठवण्यात आली होती. त्यानंतर केएल राहुलला दिलासा मिळाला. केएल राहुलचा भारत अ संघात समावेश करण्यात आला. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2019 रोजी तो पुन्हा एकदा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला.
केएल राहुलने फलंदाजीत तर सर्वांना प्रभावित केलेच. पण विकेटच्या मागे राहुलने शानदार, जबरदस्त कामगिरी केली. ती शब्दात मांडता येणार नाही. दुखापतीनंतर परतलेल्या राहुलने विकेटच्या मागे 100 टक्के योगदान दिलेय. गोलंदाजांना मदत असो किंवा डीआरएस घेण्यातील वाटा असो... राहुल खरा उतरला आहे.
राहुलने विकेटच्या मागे 15 जणांची शिकार केली आहे. फलंदाजीतही राहुलने मोक्याच्या क्षणी चांगल्या खेळी केल्या आहेत. राहुलच्या धावा कमी असतील, पण त्याचा इम्पॅक्ट जबराट होता.
पहिल्याच सामन्यात संघ संकटात असताना 97 धावांची खेळी केली होती. केएल राहुलने 9 सामन्यात 386 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. पाचव्या क्रमांकावर येऊन अखेरच्या 20 षटकात शतक झळकावणं, प्रत्येकाला शक्य नाही... ते राहुलने करुन दाखवलं.
केएल राहुलने वयाच्या 11 व्या वर्षांपासून क्रिकेट खेळायला सुरुवात केला. केएल राहुलला सुरुवातीला संघर्षाचा सामना करावा लागला.
शाळेत असतानापासूनच राहुलने क्रिकेटचे धडे घेतले. त्याला वडिलांकडून साथ मिळाली. सेमुअल जयराम यांनी केएल राहुल याला सुरुवातीला क्रिकेटचे धडे दिले.
केएल राहुलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2010 मध्ये कर्नाटक संघाकडून पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर राहुलला अंडर 19 संघात स्थान मिळाले.
अंडर 19 विश्वचषकात राहुलने प्रभावी कामगिरी केली. 2014-15 मध्ये दिलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याला खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात त्याने 185 आणि 130 धावांची खेळी केली. दोन्ही डावात शतके ठोकली.