World Cup 2023 : वर्ल्ड कपदरम्यान किंग कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूंचं डाएट काय?
टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) खेळाडूंना फिट राहण्यासोबतच त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घ्यावी लागते. मग टीम इंडियाने खेळाडू काय आहार घेतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वचषकादरम्यान विराट कोहली आणि टीम इंडियाचे खेळाडू काय-काय खातात, हे जाणून घ्या. हॉटेलच्या शेफने याबाबत खुलासा केला आहे.
टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत, त्या हॉटेलच्या शेफने विराट कोहली (Virat Kohli Diet) च्या डाएटबाबत माहिती शेअर केली आहे. कोहली काय आहार घेतो, याबाबत शेफने सांगितलं आहे.
विराट कोहली हाय प्रोटीन आणि कमी कार्बोहायड्रेट फूडला महत्त्व देतो.
विराट कोहलीला रागी डोसा यासारखे पदार्थ आवडतात.
याशिवाय भारतीय खेळाडूंना ग्रील्ड फिश आणि चिकन खायला आवडते.
प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी कोहलीला टोफू आणि सोयावर आधारित अन्न खायला आवडतं.
मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहलीसाठी उकडलेले अन्न तयार केले जाते. विराट कोणत्याही प्रकारचे चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळतो.
याशिवाय विराट कोहलीला टोफूसारखे लीन प्रोटीन्स खायला आवडतात.
विराट कोहली दुग्धजन्य पदार्थ खाणं शक्यतो टाळतो. विराट कोहलीसह टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत.