Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा 149 धावांनी उडवला धुव्वा
दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा 149 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या मोहिमेत चौथा विजय साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण आफ्रिकेनं पाचपैकी चार सामने जिंकून आठ गुणांची कमाई केली असून, विश्वचषकाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईतल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशला विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा अख्खा डाव 47 व्या षटकांत 233 धावांत आटोपला.
या सामन्यात क्विन्टॉन डी कॉकनं 174 धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेच्या डावाचा पाया घातला.
क्विन्टॉन डी कॉकनं 174 धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेच्या डावाचा पाया घातला. त्यानं 140 चेंडूंमधली ही खेळी 15 चौकार आणि सात षटकारांनी सजवली.
डी कॉकनं एडन मारक्रमच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची, तर हेन्ऱिक क्लासेनच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली.
मारक्रमनं 69 चेंडूंत 60 धावांची आणि क्लासेननं 49 चेंडूंमध्ये 90 धावांची खेळी उभारली. क्लासेननं 90 धावांच्या खेळीला दोन चौकार आणि आठ षटकारांचा साज चढवला.
दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकातील चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे.
दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यात चार विजय मिळवत आठ गुणांची कमाई केली. चौथ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर होता. बांगलादेशचा 149 धावांनी दारुण पराभव केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा रनरेटही सुधारला आहे. आफ्रिकेच्या विराट विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झालाय.