Top 5 Batsmen : वनडेमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारे खेळाडू
यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाने विश्वचषक 2023 मध्ये सलग विजयाची मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
एकदिवसीय विश्वचषकात भारताने सलग आठ सामन्यांमध्ये विजय मिळवत प्रतिष्ठा कायम राखली आहे.
एकदिवसीय सामन्यातील भारतीय क्रिकेटपटूंच्या विक्रमावर एक नजर टाकूया.
वनडेमध्ये भारतासाठी सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहा.
शुभमन गिल हा भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा फलंदाज आहे. अवघ्या 38 डावात त्याने ही कामगिरी केली आहे.
या यादीतील दुसरा फलंदाज शिखर धवन आहे, त्याने भारतासाठी 48 डावात 2000 वनडे धावा केल्या होत्या.
श्रेयस अय्यरने 49 एकदिवसीय डाव खेळून 2000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नवज्योतसिंग सिद्धूने एकदिवसीय सामन्यात 52 डावात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.
या यादीत नवज्योतसिंग सिद्धू चौथ्या क्रमांकावर आहेत.
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 52 डावांनंतर वनडेमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या
या यादीत सौरव गांगुली पाचव्या क्रमांकावर आहे.
image 13