T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपची सेमी फायनल भारतच जिंकणार, इंग्लंडला माजी कॅप्टन पॉल कॉलिंगवूडचा घरचा आहेर
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2024 ची दुसरी सेमी फायनल भारतीय प्रमाण वेळेनुसार 27 जूनला सायंकाळी 8 वाजता होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. भारत आता इंग्लंडकडून सप्टेंबर 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी सोडणार नसल्याचं चित्र आहे.
इंग्लंडचा माजी कॅप्टन पॉल कॉलिंगवूडनं एक खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. पॉल कॉलिंगवूडनं यावेळी सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव होताना दिसत नाही, असं म्हटलं.
पॉल कॉलिंगवूडनं हटलं की भारतावर सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत हल्लाबोल करण्याची योजना होती. 2022 ला आम्हाला माहिती होतं जर भारतानं पहिल्यांदा फलंदाजी केली तर आम्ही त्यांना रोखू शकतो. सध्या भारतीय संघाची तशी स्थिती राहिलेली नाही. भारतानं त्यावेळी पारंपरिक पणे क्रिकेट खेळलं होतं, असं पॉल कॉलिंगवूड म्हणाला.
भारताचा आता दृष्टिकोन बदलला आहे. पारंपरिक क्रिकेट खेळून तुम्ही वर्ल्ड कप जिंकू शकत नाही हे त्यांना समजलं आहे, असंही कॉलिंगवूड म्हणाला.
कॉलिंगवूडनं इंग्लंडला इशारा देखील दिला आहे. तुम्ही असाधारण कामगिरी केली नाही तर भारताला रोखणं अवघड आहे, असं कॉलिंगवूड म्हणाला.
खरं सांगायचं म्हटलं तर यावेळी भारताचा पराभव होईल, असं वाटत नाही.इंग्लंड समोर जसप्रीत बुमराहचं कठोर आव्हान असेल.भारत आपल्या बेस्ट टीमसह मैदानात उतरेल. बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, असं पॉल कॉलिंगवूड म्हणाला.
पॉल कॉलिंगवूडनं पुढं म्हटलं की, 120 बॉलमधील जसप्रीत बुमराहच्या 24 बॉलमुळं मोठं अंतर निर्माण होतं. भारतानं अमेरिकेतील आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर आत्मविश्वासानं कामगिर केली. रोहितच्या बेधडक फलंदाजीचा देखील इंग्लंडला धोका आहे.